9.जनाई



प्र.1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) जनाई उसाच्या फडात कोणते काम करत होती?

उत्तर: जनाई उसाच्या फडात दारे मोडण्याचे म्हणजेच उसाला पाणी लावण्याचे काम करत होती.

(आ) शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले?

उत्तर: शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनीला विमान आल्यासारखे वाटले.

(इ) जनाई का घाबरून गेली?

उत्तर: वावरात चार वाव साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली.

(ई) जनाईला शेतात का जावे लागणार होते?

उत्तर: शेतात काम केल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते;म्हणून जाणिल शेतात जावे लागणार होते.

2. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

[ रात्रंदिवस घाम गाळणे, धाबे दणाणणे, पोटात घाबरा पडणे,
पायाखालची जमीन हादरणे.]

1) रात्रंदिवस घाम गाळणे: पोटाची खळगी भरण्यासाठी तुकोबा रात्रंदिवस शेतात घाम गाळतो.

2) धाबे दणाणणे : समोर साप पाहून रामरावांचे धाबे दणाणले.

3) पोटात घाबरा पडणे: उंच कड्यावरून खाली बघताच राजूच्या पोटात घाबरा पडला.

4) पायाखालची जमीन हदारणे: समोर घडलेला अपघात पाहून रामरावांच्या पायाखालची जमीनच हादरली.

प्र. 3. पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दांत वर्णन केले आहे. त्यांच्या जोड्या जुळवा.

प्र. 4. तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा.

(अ) पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग - कापसाचे मोठ मोठे ढग आकाशात तरंगत आहेत.

(आ) पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी - पहिले की वाटत, जणू पाखरांची शाळाच भरली आहे.

(इ) फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे - रंगीबेरंगी पोशाख घालून एखाद्या समारंभाला एकत्र जमल्यासारखी दिसत होती.

(ई) गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी -
पांढरेशुभ्र मोती हारात गुंफून कोणी हर तयार करावा अशी दिसत होती.

प्र. 5. तुम्हांला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा.
उत्तर: 'का बाबा, आमची पाठ घेतलीयस? कशापायी भ्या दावाय लागलाईस ? आमच्या रानात वस्तीला हाईलाईस, तर आमची राखण करशील का, भ्या दावशील? तूच राखण कराय पायजेस.


प्र. 6. दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा व वाक्ये पूर्ण करा.

(अ) जनाईचे अंग भगभगत होते, कारण उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते.

(अ) तिने खूप काम केले होते.

(आ) उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते.

(इ) तिला झोप आली होती.

(आ) जनाई वावरातून पळत सुटली, कारण तिच्या अंगावर साप धावून आला.

(अ) तिला आकाशात विमान दिसले.

(आ) तिच्या अंगावर साप धावून आला.

(इ) तिचे संपले.

Post a Comment

0 Comments