8.प्रिय बाई


प्र. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे?

उत्तर: पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे.

(आ) पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरुन ओळखले ?

उत्तर: पत्रातील दिलेल्या पत्त्यावरुन व पत्राच्या उजव्या
कोपऱ्यातील मजकुरावरुन पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ओळखले.

(इ) ऊर्मिला आनंदाने का उडाली?

उत्तर : टीव्ही वरील बातमीत आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्या त्यामुळे ती आनंदाने उडाली.

(ई) ऊर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे?

उत्तर: उर्मिला सध्या पाचवी च्या वर्गात शिकत आहे.

(उ) ऊर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या
आहेत?

उत्तर: उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत.

(ऊ) ऊर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कोणत्या
वाक्यावरून कळते?

उत्तर : 'तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आत्ता किती मोठा झालाय? या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते, हे कळते.

प्र. 2. खालील प्रश्नांची चार- पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) ऊर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला? का दिला?

उत्तर: उर्मिलाच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिअळला; म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती. पण मोबाईल 'कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर' ची टेप वाजत होती. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही. त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला; कारण पत्र बाईंच्या कायम आठवणीत राहील.


(आ) पाचवीत आल्यापासून ऊर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टींत बदल झाला?

उत्तर: पाचवीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली, अभ्यास खूप करु लागली, खेळते सुद्धा जास्त, ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते. आपण मोठे झाले आहोत असे तिला वाटू लागले आहे. यांसारख्या गोष्टींत उर्मिला पाचवीत आल्यापासून बदल झाले.


(इ) ऊर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे?

उत्तर: उर्मिलाने पत्रात, बाईंनी शिकवलेल्या कविता,
स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईंनी
घेतलेले भन्नाट खेळ, बाईंच्या घराबाहेर असलेले गुलमोहराचे
झाड. पाचवीत आल्यापासून उर्मिलामध्ये झालेले बदल इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला आहे.

प्र. 3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता?

उत्तर: मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, तसेच प्रेरणादायक कार्यक्रम बघतो.

(आ) टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हांला बघायला आवडतात?
उत्तर : मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, तसेच प्रेरणादायक कार्यक्रम बघतो. कारण मला त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन तर होतेच पण त्यातून काही नवीन शिकायला मिळते.

(इ) तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हांला कोणते कार्यक्रम
बघायला सांगतात? त्यामागील कारणे सांगा.

उत्तर: आमच्या घरातील मोठी माणसे मला बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम बघायला सांगतात कारण दररोजच्या दिवसातील घडामोडी समजाव्यात व माझ्या ज्ञानात भर पडावी यासाठी.

(ई) दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत
कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल, तर तुम्ही
कोणकोणती माध्यमे वापरता.

उत्तर: दूर राहत असलेल्या व्यक्तींना विचार, भावना व मत
कळवायचे असल्यास मी पत्र तसेच मोबाईल फोन, ई-मेल
यांसारखी माध्यमे वापरतो.

Post a Comment

0 Comments