(अ)बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता ?
उत्तर: बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरीण मेंदी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.
(आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते?
उत्तर: शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये आहे.
प्र.२. पुढील विधानांची कारणे लिहा.
(अ) मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.
उत्तर:
१) मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होत.
२)फार मोठ्या प्रमाणवर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल, यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणवर मासेमारी करू लागला होता.
या कारणांमुळे मध्याश्मयुगात मानवाच्या आहार पद्धतींत बदल होत होता.
(आ) मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.
उत्तर:
१)भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत.
२)हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे-कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत.
३)मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत.
या कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.
प्र. ३. मध्याश्मयुगातील हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे दया .
(अ) चित्रातील घरांची रचना कशी आहे ?
उत्तर: चित्रातील घरे गवताने शाकारलेली आहेत आणि ती उतरत्या छपराची आहेत.
(आ) चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते ?
उत्तर: चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गावत, लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते.
(इ) हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात?
उत्तर: हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करणे, घरबांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत.
उपक्रम ४. विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो, ते लिहा.
उत्तर:
विविध ऋतुंमध्ये होणाऱ्या हवामानबदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. उन्हाळा ऋतुमध्ये आप्प्न सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो. पावसाला ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो. जड आहार न घेता हलक आहार घेतो. पाणी उकळून थंड करून पितो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वस्त्रे वापर्रतो. उन अंगावर घेतो. अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो. उबदार जागेत राहतो. अशा रीतीने विविध ऋतुंमध्ये हवामान बदलाचा परिमाण आपल्या जगण्यावर होतो.
प्र. ५.नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा.
उत्तर:
नवाश्मयुगीन खेडे (गाव)
१) नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती.
२)या काळामध्ये खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता.
३) या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरुपाची होती.
४) शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार मर्यादित होते.
आधुनिक खेडे (गाव)
१) आधुनिक काळात गाव- वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत.
२) आधुनिक काळातील खेड्यांत शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरु झाले आहेत.
३) आधुनिक खेड्यांत प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते.
४) आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
0 Comments