(अ) अरण्यलिपी म्हणजे काय?
उत्तर: जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात. त्या खाणाखुणा म्हणजे अरण्यालीपी होय.
(आ) वाघांची गणती कशावरून केली जाते?
उत्तर: वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते.
(इ) जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात?
उत्तर: पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी - जसे हरीण, सांबर व कालवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात.
प्र. 2. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) 'वाघाचे क्षेत्र' कशावरुन ओळखता येते?
उत्तर: वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पत्रांतून, वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाट तपासाव्या. नदीनाल्यांत ओल्या ओल्या वाळूत, मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते.
(आ) वाघ - वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो?
उत्तर: वाघ- वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात; परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो. वाघाचा मागचा पंजा चौकोनी असतो. त्याची लांबी-रुंदी सारखी असते; परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो. रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते.
(इ) शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे कशावरुन ओळखता येते?
उत्तर: काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग- जसे केस, नखे व हाडे आढळून येतात. त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते.
0 Comments