6.माहेर


प्र.1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?

उत्तर: कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे.

(आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?

उत्तर: चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे.

(इ) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.

(ई) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे.


प्र. 2. काय ते लिहा.

(अ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती -चिकणमाती

(आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ- सोजीचे पीठ

(इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन - रथ



प्र. 3. चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.

उत्तर: -चिकणमातीचा ओटा ततयार करणे - ओट्यावर जातं मांडणे -जात्यावर सोजी दळणे - सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे - भाऊ रथ घेऊन येईल रथातून माहेरला -जाणे माहेरी धिंगामस्ती करणे.

Post a Comment

0 Comments