(अ) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते?
उत्तर: एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सुक्ष्मदर्शकाची गरज असते.
(आ) एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले?
उत्तर: एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले.
प्र.२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले?
उत्तर: शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते, की सुमारे साडेचारशे अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला, एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान, चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
(आ) प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
१) प्राणी श्वासोच्छवास करतात.
२) प्राणी अन्न मिळविण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत.
प्र. ३. पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांभोवती गोल करा.
उत्तर- या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहा.
प्र. ४. पुढील घटना कालानुक्रमे लिहा.
(अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.
(आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
(इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .
(ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात निर्माण झाला.
उत्तर:
(ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात निर्माण झाला.
(आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
(अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.
(इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .
0 Comments