2.इतिहास आणि कालसंकल्पना


 प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.


(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ  असे म्हटले जाते.

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

(अ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो?

उत्तर: कर्ब १४ विश्लेषण, काष्ठवलायांचे विश्लेषण यांसारख्या विविद वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो.

(आ) इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो?

उत्तर: इसवी सनाचा पहिला शंभर वर्षांचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा ‘इ.स. १-१००’ असा लिहिला जातो.

प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .

(अ) काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे ?

उत्तर: 

१) सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा, दोन आठवड्यांचा एक पंधरवडा, चार आठवड्यांचा म्हणजे दोन पंधराव्द्यांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते.

२) वर्षामागून वर्षे संपत शंभर वर्षांचा काळ संपला, की एक शतक पूर्ण होते. अशी दहा शतके म्हणजेच एक हजार वर्षे संपली , की एक सहस्त्रक पूर्ण होते .

अशा काळाच्या विभागणीला एक्रेखिक विभागणी म्हणतात.

(आ) कालगणना करण्याची एकके कोणती?

उत्तर: सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत.

प्र. ४. पुढील तक्ता पूर्ण करा .

इतिहासाची कालविभागणी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे .

उत्तर: 

इतिहासाची कालविभागणी 

१)प्रागैतिहासिक काळ - इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही 

२)ऐतिहासिक काळ - इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध आहे. 

Post a Comment

0 Comments