14 .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


प्र.1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली ?

उत्तर: 'यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही' अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली.

(आ) तुकडोजीमहाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत?

उत्तर: तुकडोजीमहाराज हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत.

(इ) तुकडोजीमहाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर : तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीता' हा ग्रंथ लिहिला.

प्र. 2 का ते लिहा.

(अ) राजाने शिकार करण्याचे सोडले.

उत्तर : प्राण्यांची शिकार करणाऱ्या राजाला तुकडोजी महाराजांनी त्याची चूक लक्षात आणून दिली. राजाला स्वतःची चूक कळून आली. आणि त्याने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आणि शिकार करण्याचे सोडले.

(इ) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजीमहाराजांना 'देवबाबा
म्हणत.

उत्तर: तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील
स्वतःचीच कवणे खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासंतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना 'देवबाबा' म्हणू लागले.

(ई) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा 'राष्ट्रसंत'पदवीने गौरव केला.

उत्तर:
सन 1947 च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात
विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते.
स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने सहभाग घेतला. तसेच स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले. आचार्य विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या भूदान चालवलीत भाग घेऊन त्यांनी भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला.

प्र. 3. तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा.

(अ) श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले ?

उत्तर : सन 1947 च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने सहभाग घेतला. यामध्ये हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवामंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, आयोजित केले. त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता, ग्रामोद्योग संवर्धन, आरोग्य संरक्षण यांसारखे अनेक उपक्रम राबवले.

(आ) सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत
तुकडोजीमहाराजांनी काय केले?

उत्तर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश दिला जात
नव्हता. या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.

(इ) राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले?

उत्तर: जपानमध्ये आयोजित परिषदेमध्ये राष्ट्रसंत
तुकडोजीमहाराज यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली. त्या ठिकाणी अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले.


Post a Comment

0 Comments