उत्तर: वरील बातम्यांची शीर्षके ही पुणे जिल्हातील माळीण
गावच्या भूस्खलनासंबंधित आहेत.
2. माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती ?
उत्तर: माळीण गावात 40 ते 50 कुटुंबे राहत होती.
3. कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता ?
उत्तर : नासा संथेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता.
4. मदतीची घोषणा कोणी केली ? कशा स्वरुपात ?
उत्तर: मदतीची घोषणा राज्य सरकारने केली. पैशांच्या स्वरुपात.
5. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले ?
उत्तर: ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले.
6. ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली?
उत्तर:ढिगाऱ्याखालचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
7. माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि
कोणत्या दिवशी घडली?
उत्तर: माळीण गावाबाबतची दुर्घटना पावसाळा ऋतूत 30 जुलै 2014 या दिवशी घडली.
8. शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले ?
उत्तर: मोबाईल सुविधा आणि वीजपुरवठा नसल्याने शोधकार्यात अडथळे आले.
9. माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली ?
उत्तर: माळीण गावातील लोकांना एन. डी. आर.एफ., डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा, जागरूक नगरीत या साऱ्यांनी मदत केली.
विचार करा. शोध घ्या.
1. या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील, असे तुम्हांला
वाटते ?
उत्तर:
1) नासाच्या इशाऱ्याकडे झालेले दुर्लक्ष
2) पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल
3) सरकारी यंत्रणेची अनास्था .
4) नैसर्गिक संकट
2. नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते, याची
शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा.
उत्तर : नासा ही अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्र आहे. ही संस्था भौगोलिक घटनांसंबधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी सर्वात मोठी संस्था आहे.
3. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील? विचार करा व लिहा.
उत्तर:अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने, दुर्गम भाग असल्यामुळे इतर यंत्रणेला या घटनांसंबंधित उशिरा माहिती मिळते. दुर्घटनेत दळणवळण सुविधा तसेच संदेशवहन सुविधा बंद पडल्याने दुर्घटनेच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे आणि मदत करणे कठीण होऊन जाते. वीजपुरवठा खंडित होतो. मदत पोहचण्यास उशीर होतो. जीवित व वित्तहानी होते.
4. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरुपात मदत याची
शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. करता येईल ते लिहा.
उत्तर: 1) दुर्घनाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अन्न, पाणी, तसेच वस्त्र यांचा पुरवठा लोकांना करता येईल. 2) घरातील मोठ्या लोकांशी बोलून काही प्रमाणात आर्थिक मदत आपत्तीग्रस्तांना पाठवता येईल. 3) मदतीच्या कार्यात सहभाग घेता येईल.
0 Comments