1.इतिहास म्हणजे काय?


प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.

(आ) इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही .


प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?

उत्तर: प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात.


आ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे?

उत्तर: स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.

 
इ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते?

उत्तर: इतिहासाच्या अभ्यासामुळे समाजाच्या हितासाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते.

प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते?

उत्तर:

१) भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तश्या घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नाही.

२) इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्री पद्धतींचाच उपयोग केला जातो

३) आवश्यकता भासल्यास इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते.

४) इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शस्त्र आहे असे म्हटले जाते.

 
(आ) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात?

उत्तर: 

१) माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामुहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते.

२) एखाद्या गावात गावातील लॉक एकजुटीने सगळी कामे पार पडतात, तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो.

३) ज्या वेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात.

प्र.४. संकल्पनाचित्र तयार करा.

गावाचा इतिहास कोणाचा

गावाचा

जिल्ह्याचा

राज्याचा

देशाचा

जगाचा मानवी

संस्कृतीचा माझा

शाळेचा

प्र.५. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.

इतिहासाची साधने: - नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा.

उत्तर: 

Post a Comment

0 Comments