9. मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
स्वाध्याय
प्र.1. योग्य पर्याय निवडा,
1.औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता:- छत्रपती संभाजी महाराज.
2.बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे:-संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण
3. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थकरणारा- येसाजी कंक.
प्र.2. पाठात शोधून लिहा.
1. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले?
1. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले?
सिद्दीच्या ताब्यातील दंडाराजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडिमार केला. परंतु, त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
2. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?
पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली. म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना घडा शिकवायचे ठरवले.
3. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली?
रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सरदवर स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली.
4. महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?
अर्थ:-
राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची- औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाला, त्याचे तेज हरपले. भद्रकाली प्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची पत्नी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले, म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा. !"
प्र.3. का ते लिहा.
1.औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.
औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला.
2. संभाजी महाराजांनंतर नेतृत्वाखाली रायगड मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
→ औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले. त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
3. महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही; राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे सर्वांनी मिळून धोरण ठरवण्यात आले.
0 Comments