प्रश्न १. (अ) खालील बाबींच्या नकाशांचे बृहद्प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.
(१) इमारत
(२) शाळा
(३) भारत देश
(४) चर्च
(५) मॉल
(६) जगाचा नकाशा
(७) बगिचा
(८) दवाखाना
(९) महाराष्ट्र राज्य
(१०) रात्रीचे उत्तर आकाश
उत्तर -
• बृहदप्रमाण नकाशा -
(१) इमारत
(२) शाळा
(3) चर्च
(४) मॉल
(५) बगिचा
(६) दवाखाना
• लघुप्रमाण नकाशा -
(१) भारत देश
(२) जगाचा नकाशा
(३) महाराष्ट्र राज्य
(४) रात्रीचे उत्तर आकाश.
(आ) १ सेमी = १०० मी व १ सेमी = १०० किमी अशा प्रमाणाचे दोन नकाशे आहेत. यांपैकी बृहद्प्रमाणाचा नकाशा व लघुप्रमाणाचा नकाशा कोणता ते सकारण लिहा. या नकाशांचे प्रकार ओळखा.
उत्तर -
* १ सेमी = १०० मी व १ सेमी = १०० किमी अशा प्रकारचे दोन नकाशे आहेत. यांपैकी १ सेमी = १०० मी हा बृहद्प्रमाणाचा नकाशा आहे.
* कारण -
१) १ मीटर म्हणजेच १०० सेमी होय आणि १०० मीटर म्हणजे १०,०00 सेमी होय.
२) म्हणजेच, दिलेल्या नकाशातील शब्दप्रमाण १ सेमी = १०० मी आहे व संख्याप्रमाण १ : १०००० आहे.
३) १ : १०००० किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असलेले सर्व नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. म्हणून १ सेमी = १०० मी हा बृहद्प्रमाण नकाशा आहे.
* प्रकार - (१) गाव, शेत, बगिचा इत्यादींचे नकाशे बृहद्प्रमाण प्रकारचे नकाशे आहेत. (२) भारत देश, जग, रात्रीचे उत्तर आकाश इत्यादींचे नकाशे लघुप्रमाण प्रकारचे नकाशे आहेत.
प्रश्न २. नकाशसंग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळरेषेत नकाशा प्रमाणाच्या साहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा.
उत्तर -
शहरे - नकाशातील अंतर - प्रत्यक्ष अंतर
१. मुंबई ते बंगळुरू - ०.९८ सेमी - ९८० किमी
२. विजयपुरा ते जयपूर - २ सेमी - २००० किमी
३. हैदराबाद ते सुरत - ०.९ सेमी - ९०० किमी
४. उज्जैन ते शिमला - १.१४ सेमी - ११४० किमी
५. पटना ते रायपूर - ०.७५ सेमी - ७५० किमी
६. दिल्ली ते कोलकाता - १ सेमी - १००० किमी
(आ) १ सेमी= ५३ किमी या शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रूपांतर करा.
उत्तर -
१) १ किमी म्हणजे १००००0 सेमी होय आणि ५३ किमी म्हणजे ५३००००० सेमी होय.
२) म्हणून १ सेमी = ५३ किमी या शब्दप्रमाणाचे १:५३००००० याप्रमाणे अंकप्रमाणात रूपांतर होईल.
(इ) १:१००००० या अंकप्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात रूपांतर करा.
उत्तर -
१००००० सेमी म्हणजे १ किमी होय.
२) १ : १००००० या अंकप्रमाणाचे १ सेमी = १ किमी हे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात रूपांतर होय.
0 Comments