प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटींत अशी खूण करा.
(अ) औदयोगिक विकासावर खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष परिणाम करत नाही ?
(i) पाणी
(ii) वीज
(iii) मजूर
(iv) हवा
उत्तर - हवा
(आ) खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे ?
(i) यंत्रसामग्री उद्योग
(ii) पुस्तकबांधणी उदयोग
(iii) रेशीम उद्योग
(iv) साखर उद्योग
उत्तर - पुस्तकबांधणी उदयोग
(इ) खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही ?
(i) जुनी दिल्ली
(ii) नवी दिल्ली
(iii) नोएडा
(iv) बंगळूरू
उत्तर - जुनी दिल्ली
(ई) उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे?
(i) आयकर
(ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व
(iii) वस्तू व सेवा कर
(iv) विक्री कर
उत्तर - उद्योगांचे सामाजिक दायित्व
प्रश्न २. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने
अ) देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात.
उत्तर - अयोग्य.
दुरुस्त विधान - देशातील लघु व मध्यम अवजड उद्योगांना पूरक ठरतात.
आ) देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे.
उत्तर - योग्य.
इ) औदयोगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.
उत्तर - योग्य.
ई) उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य आहे.
उत्तर - अयोग्य.
दुरुस्त विधान - उदयोगांचे सामाजिक दायित्त्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही.
प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार ओळींत लिहा.
(अ) औदयोगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात?
उत्तर - देशाच्या आर्थिक विकासात उदयोगांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देशांत औदयोगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औदयोगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रांतील उदयोगांना वीज, पाणी, कर यांमध्ये विशेष , सवलती दिल्या जातात.
(आ) औदयोगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर -
१) कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उदयोगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते.
२)देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औदयोगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे.
३)देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. त्यामुळे परकीय चलनाची प्राप्ती वाढते.
अशा अनेक कारणांसाठी देशात औदयोगिकीकरणाला चालना देणे आवश्यक आहे.
(इ) उदयोगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्तेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा.
उत्तर - समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाजहितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. या हेतूने पाच कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उदयोजकांनी अथवा उद्योगसमूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी २% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी. याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते.
१) शैक्षणिक सोयी-सुविधा पुरवणे.
२) आरोग्यविषयक सुविधा पुरवणे.
३) गाव अथवा विभागाचा विकास करणे.
४) निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे.
उदयोगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उदयोगसमूहांना सरकारकडून कर सवलत मिळते.
(ई) लघुउद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा.
उत्तर -
१) कच्चा माल, भांडवल जागा कमी प्रमाणात आवश्यकता असते.
२) मनुष्यबळ कमी असते.
३) कमी भांडवलात उत्पन्न मिळवता येते.
४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(अ) औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
उत्तर -
१) एखादया प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदा., कच्चा माल, मनुष्यबळ,पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ, इत्यादी. वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. या घटकांचे वितरण असमान असल्याने औदयोगिक विकासदेखील सारख्या प्रमाणात होत नाही.
२) काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात, तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात.
(आ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा.
उत्तर -
१) महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औदयोगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औदयोगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे. यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांतही अशी महामंडळे आहेत. या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
२) औदयोगिक क्षेत्रांतील उद्योगांना वीज, पाणी, कर यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात.
(इ) माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा.
उत्तर -
१)माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते.
२)या उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या उद्योगांत कार्यरत असलेले मनुष्यबळ होय. कुशल
या उदयोगांत तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहीत करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे, इत्यादी कामे केली जातात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल, इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे.
३)आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध प्रकारांची माहिती संगणकात संग्रहीत केली जाते. व तिचा जगभर वापर केला जातो.
(ई) भारतातील लोकसंख्येचा विचार करता उदयोग निर्मिती हा बेरोजगारेवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा.
उत्तर -
१) कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औदयोगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. यामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो.
२) भारतात मोठ्या प्रमाणावर जर उद्योग धंदे वाढवले असता अनेक बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
३) उद्योगनिर्मिती हा एक चांगला उपाय म्हणता येईल.
प्रश्न ५. खालील विधानासाठी ओघतक्ता तयार करा.
(अ) आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा.
उत्तर -
शेतमाल > सुतनिर्मिती > कापडाची निर्मिति
(ब) एखाद्या उदयोगाच्या आवश्यक घटक लिहा.
उत्तर -
प्राकृतिक घटक
१) मृदा
२) खनिज संपत्ती
३) पाणीपुरवठा
⬇
आर्थिक घटक
१) शेती व कच्चा माल
२) वाहतूक
३) बाजारपेठ
४) भांडवल
⬇
इतर घटक
१) मनुष्यबळ संख्या व गुणवत्ता
२) वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती
प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.
(अ) मध्यम उद्योग - अवजड उद्योग
उत्तर -
मध्यम उद्योग
१) या उद्योगामध्ये कमी भांडवल व कमी मनुष्यबळ लागते.
२) या उद्योगासाठी कमी जागा लागते.
३) निर्मिति प्रक्रिया साधी असते.
४) उदा. फळप्रक्रिया उद्योग, गुन्हाळ इत्यादी .
अवजड उद्योग
१) या उद्योगामध्ये जास्त भांडवल व जास्त मनुष्यबळ लागते.
२) या उद्योगासाठी जास्त जागा लागते.
३) निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची असते.
४) साखरनिर्मिती, कापडनिर्मिती, वाहननिर्मिती,
(आ) कृषीपूरक उदयोग - माहिती तंत्रज्ञान उदयोग
उत्तर -
कृषीपूरक उदयोग
१) हा उद्योग शेतीशी सबंधित आहे
२) हा उद्योग मनुष्यबळात अवलंबून असतो
३) या उदयोगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यांमध्ये दुग्धव्यवसाय, फळप्रक्रिया, अन्नप्रक्रिया, गुन्हाळ, इत्यादींचा समावेश होतो.
माहिती तंत्रज्ञान उदयोग
१) हा उद्योग संगणकाशी संबंधित आहे.
२) हा उद्योग संगणक, मोबाईल ,इंटरनेट यावर अवलंबून आहे.
३) या उद्योगांत तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहीत करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे, इत्यादी कामे केली जातात.
0 Comments