१. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मूलभूत हक्क म्हणजे काय ?
उत्तर :
१.प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात, त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात.
२.अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल.
३. संविधानाद्वारे अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते यास मुलभूत हक्क असे म्हणतात.
(२) विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके/पदव्या दिल्या जातात ?
उत्तर :
विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके पदव्या दिल्या जातात.
१. संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी: परमवीर चक्र, अशोकचक्र, शौर्यचक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात.
२. पदव्या: पद्मश्री, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘भारत रत्न या पदव्या दिल्या जातात.
(३) चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?
उत्तर :
१.शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय.
२.बालकांचे शोषण थांबवण्यासाठी भारतीय संविधानाने विशेष तरतूद केली आहे त्यानुसास्र बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.
३.त्यानुसार १४ वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी जसे कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे.
(४) संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत ?
उत्तर :
१.सर्व व्यक्तींना अन्याय, शोषण, भेदभाव, वंचीतता यांपासून संरक्षण हवे असते. तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील.
२.संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत.
२. ‘स्वातंत्र्याचा हक्क’ या विषयावर चित्रपट्टी तयार करा.
३. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत.
उत्तर :
कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होतात.
(२) सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकते.
उत्तर :
सरकारी नोकर्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान, यांवर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही.
4.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
0 Comments