2.संविधान उद्देशिका

 



प्रश्न १ . शोधा व लिहा.

१.      देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.

उत्तर: बंधुभाव


 


२.   राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.

उत्तर: लोकशाही


 


३.  उद्देशिकेलाच म्हंटले जाते.

उत्तर: सरनामा


 


४.   सर्व धर्मांना समान मानणे.

उत्तर: धर्मनिरपेक्ष


प्रश्न २. लिहिते होऊया.

 


१)  धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या  तरतुदी असतात?

उत्तर:


१.धर्मनिरपेक्ष राज्यात सर्र धर्मांना समान मानले जाते.


२.कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही.


३.नागरिकांना आपापल्या धर्मांचे पालन करण्याची मुभा असते.


४.नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही .


 


२)   प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?

उत्तर:


१.वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे, त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात.


२.हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म, इत्यादी कोणत्याही बाबी विचारत घेतल्या जात नाहीत.


३.राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा त्यामागे उद्देश असतो.




 


३)   आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात?

उत्तर:


१.    भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे.


२.    या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे.


३.    दारिद्र्यामुळे निर्माण होणार्या  भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्यांवर मात करणे हा यामागील उद्देश आहे.


 


४)     समाजात व्यक्तीप्रतिष्ठा कशी निर्माण होईल.

उत्तर:


१.व्यक्तीप्रतिष्ठा  म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान मिळणे होय.


२.समाजामध्ये सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने व सन्मानाने वागले पाहिजे.


३.जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्कांचा सन्मान करील, तेव्हा समाजात व्यक्तीप्रतिष्ठा निर्माण होईल.


 


प्रश्न ३. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशाप्रकारे केला पाहिजे, तुमचे मत लिहा/ सांगा.

उत्तर:


१.संविधाने सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे या स्वातंत्र्याचा उपयोग प्रत्येक नागरिकाने आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी करावा.


२.स्वातंत्र्याचा उपयोग करून समाजातील चांगल्या तसेच वाईट गोष्टींवर आपले विचार मांडावेत.


३.स्वातंत्र्याचा उपयोग करून सामाजिक मदत करावी.


४.स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्या मनाप्रमाणे वागणे योग्य नाही आपल्याबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी.


५.समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य देखील जपले गेले पाहिजे.


प्रश्न ४. संकल्पना स्पष्ट करा.



१.    समाजवादी राज्य:

उत्तर:


१.समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते.


२.देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो.


३.संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते.         


२.    समता:

उत्तर:


१.संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतची समतेची हमी दिली आहे.


२.जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल.


३.सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान प्राप्त होतील.


४.व्यक्तीव्यक्तीत उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय.




३.    सार्वभौम राज्य:

उत्तर:


१.एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय.


२.सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो.


३.सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम सून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना आहे.


४.ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले.




४.    संधीची समानता.

उत्तर:


१.भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची सामना हे तत्व मान्य केले आहे.


२.प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी भारतीय संविधानाने दिलेल्या आहेत. या संधी उपलब्ध करून देत असताना नागरिकांत जात, धर्म, भाषा, प्रांत, इत्यादी बाबतींत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे .


 


 


प्रश्न ५. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे.

उत्तर:


१)भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते; तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्व्तःप्रत अर्पण करीत आहोत या शब्दांनी होतो.


२.आपण सर्व भारताचे नागरिक सून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे सध्या करायची आहेत, याची हमी दिलेली आहे.


३.भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments