1.आपल्या संविधानाची ओळख.

 





१. आपल्या संविधानाची ओळख.

स्वाध्याय 

१. पुढील संकल्पना स्पष्ट करा:

१) संविधानातील तरतुदी

देशाच्या कारभारासंबंधी अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो, या अनेकविध बाबींनाच 'संविधानातील तरतुदी' असे म्हणतात. आतरतुदीनुसास देशाचा राज्यकारभार चालतो.


संविधान दिन

→ मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसालाच "संविधान दिन' असे म्हणतात.

2.  चर्चा करा.

१) संविधान समितीची स्थापना केली गेली. 

→ इ.स. १९४६ पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. १९४६ साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले, अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली, म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय स्वातंत्र्याचे संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 

संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला, ही सर्व कामे डॉ. आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' असे म्हटले जाते.

3.देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. 

देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगारनिर्मिती व दारिद्र्यनिर्मूलन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दारिद्र्यनिर्मूलन, समाजातील दुर्बल घटक, महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेतून संशोधनापर्यंतचे अनेक विषय.


3. योग्य पर्याय निवडा

१) कोणत्या देशाचे संविधान पूर्णत: लिखित नाही? 

-इंग्लडचे

2) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

- डॉ. राजेंद्रप्रसाद

3) खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते.

→ महात्मा गांधी

४) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर




Post a Comment

0 Comments