1. शोधा म्हणजे सापडेल.
अ. आपल्या दीर्घिकेचे नाव .......... हे आहे.
उत्तर : आपल्या दीर्घिकेचे नाव मंदाकिनी हे आहे.
आ. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी .......... हे एकक वापरतात.
उत्तर : प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे एकक वापरतात.
इ. प्रकाशाचा वेग .......... km/s एवढा आहे.
उत्तर : प्रकाशाचा वेग 3000000km/s एवढा आहे.
ई. आपल्या आकाशगंगेत सुमारे .......... तारे आहेत.
उत्तर : आपल्या आकाशगंगेत सुमारे 10 अब्ज तारे आहेत.
उ. सूर्याची अंतिम अवस्था .......... असेल.
उत्तर : सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू असेल.
ऊ. ताऱ्यांचा जन्म .......... मेघांपासून होतो.
उत्तर : ताऱ्यांचा जन्म आंतरतारकीय मेघांपासून होतो.
ए. आकाशगंगा ही एक .......... दीर्घिका आहे.
उत्तर : आकाशगंगा ही एक चक्राकार दीर्घिका आहे.
ऐ. तारे हे .......... वायूचे गोल असतात.
उत्तर : तारे हे तप्त वायूचे गोल असतात.
ओ. ताऱ्यांचे वस्तुमान .......... वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
उत्तर : ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
औ. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ..........एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास .......... एवढा वेळ लागतो.
उत्तर : सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 8 मिनिटे एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 1 सेकंद एवढा वेळ लागतो
अं. ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची .......... जलद गतीने होते.
उत्तर : ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची उत्क्रांती जलद गतीने होते.
अः. ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या .......... अवलंबून असते.
उत्तर : ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
2. कोण खरे बोलतय?
अ. प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात.
उत्तर : चूक
आ. ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.
उत्तर : बरोबर
इ. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.
उत्तर : चूक
ई. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.
उत्तर : चूक
उ. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.
उत्तर : चूक
ऊ. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.
उत्तर : बरोबर
8vi samanya vidnyan swadhyay | Swadhyay iyatta 8 vi vidnyan dhada 19 va | Dhada 19 swadhyay iyatta 8vi vidnyan
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. ताऱ्यांची निर्मिती कशी होते?
उत्तर :
१. दीर्घिकांतील ताऱ्यांच्यामध्ये असलेल्या रिक्त जागांत ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात, ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात.
२. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्षे इतका असतो.
३. एखाद्या विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात
४. या आकुंचनामुळे त्यांची घनता वाढत जाते व तसेच त्यांचे तापमानही वाढू लागते व त्यांमधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर तेथे अणुऊर्जा निर्मिती सुरू होते.
५. या ऊर्जानिर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो असे आपण म्हणू शकतो.
आ. ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते?
उत्तर :
1. ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मांत बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांत रूपांतर होण्याची प्रक्रिया होय.
2. तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने त्यांतील ऊर्जा सतत घटत असते.
3. ताऱ्याचे स्थैर्य कायम राहण्यासाठी, म्हणजे वायूचा दाब व गुरुत्वीय बल यांत समतोल राहण्यासाठी ताऱ्याचे तापमान स्थिर राहणे आवश्यक असते व तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ऊर्जानिर्मिती होणे आवश्यक असते.
4. ही ऊर्जानिर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधन जळण्याने होते. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचा साठा कमी होणे हे आहे.
इ. ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या?
उत्तर : ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या अंतिम अवस्थेचे तीन मार्ग आहेत.
1. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः श्वेत बटू या अवस्थेत येतात.
2. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन अवस्थेत येतात.
3. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटींहून अधिक वस्तुमान असलेल्या तार्यांचे अंतिमतः कृष्णविवर बनते.
ई. कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले?
उत्तर :
1. सूर्याच्या वस्तुमानाच्या २५ पटींहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यात अंतिम स्थितीत जातो तेव्हा या तारयाचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते.
2. यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही.
3. ताऱ्यावर पडलेला प्रकाशही परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसू शकेल.
4. म्हणून या अंतिम स्थितीस कृष्ण विवर हे नाव दिले आहे.
उ. न्युट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते?
उत्तर :
1. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन अवस्थेत येतात.
2. हे तारे महाराक्षसी अवस्थेतून जातात तेव्हा त्यांचा आकार 1000 पटींनी वाढतो.
3. उत्क्रांतीच्या शेवटी होणारा महाविस्फोट खूपच शक्तिशाली असतो.
4. त्यानंतर अशा ताऱ्याचा केंद्रातील भाग इतका आकुंचित होतो की त्यांचा आकार केवळ १० किमी च्या आसपास येतो.
4. अ. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
1. मंदाकिनी दिर्घिकेत असणाऱ्या अब्जावधी तार्यांपैकी मी सूर्य एक तारा आहे. माझे स्वतःचे एक कुटुंब असून त्यामध्ये ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, धुमकेतू आणि उल्काभ असे घातक आहे. माझ्या कुटुंबातील मी एकमेव तारा आहे.
2. पृथ्वीपासून मी जवळ असल्याने पृथ्वीवासीयांना मी मोठा दिसतो. प्रत्यक्षात मी एक सामान्य तारा असून माझ्यापेक्षा कमी किंवा आधीक वस्तुमान असलेले अब्जावधी तारे या आकाशात आहेत.
3. माझे वस्तुमान 2 x 10^30 kg असून माझी त्रिज्या 695700 km इतकी आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5800 K असेऊन केंद्रातील तापमान 1.5 x 107 K आणि माझे वय वय 4.5 अब्ज वर्षे इतके आहे.
4. माझ्या एकूण वस्तुमानापैकी 72 टक्के भाग हा हायड्रोजनचा, तर 26 भाग हेलिअम ने बनलेला आहे. उर्वरित २ % भाग हा हेलिअम पेक्षा अधिक अणुक्रमांक असणार्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रुपात आहे.
5. माझे आजचे वय हे ४.५ अब्ज वर्षे आहे. माझ्या जीवन्कालातील उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात माझे तांबडा राक्षसी ताऱ्यात माझे रुपांतर होईल व नंतर विस्फोट होऊन पुढे मासे रुपांतर श्वेत बटू या पृथ्वीएवढ्या आकाराच्या लहान ताऱ्यात होईल. तीच माझी अंतिम स्थिती असेल.
ब. श्वेत बटू बद्दल माहिती द्या
उत्तर :
1. ताऱ्यांच्या मूळ वास्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे व अंतीम स्थितीचे तीन गट पडतात. यापैकी एक गटातील ताऱ्यांची अंतिम स्थिती ही श्वेत बटू असते.
2. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग आकुंचित होतो. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकाराइतका होतो.
3. ताऱ्यांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वीइतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते.
4. तारयांतील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंतकाळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो.
5. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेत बटू म्हणून ओळखले जातात.
0 Comments