16. प्रकाशाचे परावर्तन

 


1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ. सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला ................ म्हणतात.


उत्तर:   सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका  म्हणतात.

 


आ. लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे ..........परावर्तन असते.


उत्तर:  लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते.

 


इ. कॅलिडोस्कोपचे कार्य ................. गुणधर्मावर अवलंबून असते.

उत्तर:  कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तीत प्रकाशाचे परावर्तन  गुणधर्मावर अवलंबून असते


2. आकृती काढा.


दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 900 चा कोन करतात. एका आरशावर आपाती किरण 300 चा  आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून  परावर्तित होणारा किरण काढा.

उत्तर:



3. ‘आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू  शकत नाही’, या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल ?

उत्तर: 



4. नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.

उत्तर: 






5. खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा.
· आपाती किरण
उत्तर:  जे प्रकाशकिरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात, त्यांना आपाती किरण (Incident ray) म्हणतात.

 

· परावर्तन कोन
उत्तर:  परावर्तीत किरण व स्तंभिका यांच्यामधील कोनाला परावर्तन कोन म्हणतात.

 

· स्तंभिका
उत्तर:  अपाती बिंदुतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका.

 

· आपात बिंदू
उत्तर:  आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात, त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात.



· आपतन कोन
उत्तर: अपाती  किरण व स्तंभिका यांच्यामधील कोनाला आपतन कोन म्हणतात.

 

· परावर्तित किरण
उत्तर: पृष्ठभागावरून परत किरणाऱ्या किरणास परावर्तित किरण (Reflected ray) म्हणतात.

6. खालील प्रसंग अभ्यासा.

स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत  होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत  होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे  त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा  विस्कळीत होण्याचे कारण समजेना. खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला  प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
 

अ. प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचा  काही संबंध आहे का ?

उत्तर: होय , प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचा  संबंध आहे.

 

आ. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.

उत्तर: संथ पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित पर्यावरण होते. तर पाण्यात दगड टाकल्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते. प्रकाशाचे नियमित व अनियमित परावर्तन हे प्रकार लक्षात येतात.

 

इ. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम  पाळले जातात का ?

उत्तर : होय, प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम  पाळले जातात.

7. उदाहरणे सोडवा.
अ. सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन  400  चा असेल, तर आपतन कोन व परावर्तन  कोनांची मापे काढा.  (उत्तर : 50 डीग्री )
उत्तर:

PQ : आरसा

AB:  आपाती किरण

NB :  स्तंभिका

BC : परावर्तीत किरण

कोन BQ :  40  ………… दिलेले.

कोन NBQ : 90 ……… NB स्तंभिका

कोन NBC = NBQ – CBQ

         = 90 – 40

         = 50 डीग्री  

परावर्तन कोन : 50 डीग्री

आपातन कोन : 50 डीग्री

 

         
आ. आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 230असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती  असेल ? (उत्तर : 67 डीग्री)
उत्तर:

PQ : आरसा

AB:  आपाती किरण

NB :  स्तंभिका

BC : परावर्तीत किरण

कोन CBQ :  23  ………… दिलेले.

कोन NBQ : 90 ……… NB स्तंभिका

कोन NBQ – CBQ

         = 90 – 23

         = 67 डीग्री  

परावर्तन कोन : 67 डीग्री

आपातन कोन : 67 डीग्री

Post a Comment

0 Comments