अ. ATP तयार करण्याचा कारखाना आहे.
उत्तर: तंतूकणिका
आ. एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.
उत्तर: रिक्तिका
इ. पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.
उत्तर: आंतर्द्रव्यजालिका
ई. पेशींचा जणू रसायन कारखाना.
उत्तर: हरितलवक / तंतुकणिका
उ. माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी.
उत्तर: हरितलवक
2. तर काय झाले असते?
अ. लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या.
उत्तर:
१) तंतुकणिका ऑक्सिजनचा वापर करून उर्जानिर्मिती करीत असतात.
२) लोहित रक्तकणिकेत तंतूकणिका असत्या तर ऑक्सिजन पेशीपर्यंत वाहून नेण्याआधीच तो वापरला गेला असता.
३) पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता.
आ. तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.
उत्तर:
१) तंतूकणिका पेशीमध्ये असणाऱ्या कर्बोदके आणि मेदाचे विकरांच्या सहाय्याने सतत ओक्सिडीकरण करीत असते. तर लाव्के हे पेशीअंगक संश्लेषण करणारे असते.
२) दोन्ही पेशीत त्यांच्या कार्याप्रमाणेच भिन्न विकरे असतात. तंतूकणिका व लवके यांमध्ये फरक नसता तर त्यांची नेमकी कार्ये पार पडली नसती.
इ. गुणसूत्रांवर जनुके नसती.
उत्तर:
१) गुणसूत्रांवर जनुके नसती तर अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसर्या पिढीत संक्रमित झाले नसते.
२) जनुकांमुळे प्रथिने संश्लेषण प्रक्रिया देखील चालू असते. त्याही प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असता.
ई. पारपटल निवडक्षम नसते.
उत्तर:
१) निवद्क्षम पार पटलामुळे काही पदार्थ पेशीच्या आत जातात, तर काही पदार्थ पेशीच्या आत घेतले जात नाहीत. परंतु अशी व्यवस्था नसेल तर पदार्थांच्या या हालचालींवर काहीच नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे परासरण यासारख्या क्रियादेखील योग्य प्रकारे होणार नाही.
उ. वनस्पतीत ॲन्थोसायानिन नसते.
उत्तर:
१) वनस्पतीत ॲन्थोसायानिन नसते तर कोणत्याच वनस्पतीच्या भागात जांभळा किंवा निळा रंग दिसला नसता.
२) परागीभवन आणि बीजप्रसार होण्यासाठी असा रंग कीटकांना आकर्षित करतो.
३) वनस्पतीत ॲन्थोसायानिन नसते तर अशा प्रक्रिया झाल्या नसत्या. ॲन्थोसायानिन हे काही प्रमाणावर वनस्पतींचे संरक्षण करते ते सुद्धा झाले नसते.
3. आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या.
अ. केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतर्द्रव्यजालिका
उत्तर: केंद्रकी
इतर सर्व पेशीअंगके आहेत. केंद्रकी ही केंद्राक्तील एक रचना आहे.
आ. डी.एन.ए, रायबोझोम्स, हरितलवके
उत्तर: हरितलवके
हे पेशीअंगक आहे. उरलेले दोन्ही सर्व प्रकारच्या पेशीत असतात.
4. कार्ये लिहा.
अ. पेशीपटल
उत्तर:
१) हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते.
२) पेशीपटल हे निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करते.
३) पेशीपटलामुले समस्थिती राखली जाते.
४) प्राणी पेशीमध्ये पेशीपटल हे पेशीच्या अंतर्गत भागाचे संरक्षण करते.
५) विसरण आणि परासरण या प्रक्रिया पेशीपटलामुळे चालतात.
आ. पेशीद्रव्य
उत्तर:
१) पेशीद्रव्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात.
२) पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते.
३) पेशीद्रव्य पेशींच्या हालचाली होण्यास मदत करतो.
४) हे जेलीसारखा पदार्थ असून यामध्ये अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात.
इ. लयकारिका
उत्तर:
१) रोगप्रतिकार यंत्रणा - पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करते.
2. उद्ध्वस्त करणारे पथक - जीर्ण व कमजोर पेशीअंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात.
3. आत्मघाती पिशव्या - पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वत:च्याच पेशीचे पचन करतात.
4. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते.
ई. रिक्तिका
उत्तर:
1. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे.
2. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते (ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी) साठवणे.
3. प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते.
4. वनस्पतीपेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात.
उ. केंद्रक
उत्तर:
१) पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण ठेवणे.
२) जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे.
३) केंद्रक हा पेशीच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो.
0 Comments