१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा.
(१) पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
(अ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद
(ब) कावेरी पाणीवाटप
(क) निर्वासितांचे प्रश्न
(ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद
(२) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
(अ) रोजगाराचा अधिकार
(ब) माहितीचा अधिकार
(क) बालकांचे अधिकार
(ड) समान कामासाठी समान वेतन
(३) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
(अ) शिक्षक दिन
(ब) बालदिन
(क) वसुंधरा दिन
(ड) ध्वजदिन
२. पुढील विधाने चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
(१) पर्यावरणीय -हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण-
(१) औद्योगिकीकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे.
(२) तेलाच्या व वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला
धोका निर्माण झाला आहे.
(३) हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहात नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत
आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील
सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
(२) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे सहज तयार होतात.
उत्तर: हे विधान चूक आहे; कारण -
(१) निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्यावाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई
वाढते.
(२) स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्यामुळे जनतेत असंतोष वाढतो.
(३) गुन्हेगारीचे प्रमाण वाढून राज्यात शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या समस्या निर्माण होत
असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होत नाहीत.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मानवी हक्क
उत्तर: (१) माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या
अधिकारांना 'मानवी हक्क' असे म्हणतात.
(२) मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे.
(३) मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश
होतो.
(४) मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते.
(२) पर्यावरणीय न्हास.
उत्तर: (१) औदयोगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे.
(२) रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर; यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत
आहेत.
(३) अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे.
(४) वायू, ध्वनी आणि जलप्रदूषण वाढले आहे. वृक्षतोड होत आहे. या सर्वालाच 'पर्यावरणीय हास' असे
म्हणतात. या पर्यावरणीय हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत.
(३) दहशतवाद.
उत्तर:
(१) आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती
निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृतीला 'दहशतवाद' असे म्हणतात.
(२) दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो.
(३) दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते.
(४) दहशतवाद ही देशात संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
५. तुमचे मत नोंदवा.
(१) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर: मानवी हक्क प्रस्थापित करण्याबाबत भारताची पुढीलप्रमाणे सकारात्मक भूमिका आहे
(१) भारतीय संविधानात मानवी हक्कांना 'मूलभूत हक्कां'चे स्थान देण्यात आले आहे.
(२) त्यामुळे या हक्कांवर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते. म्हणजेच
मानवी हक्कांना न्यायालयाचे संरक्षण देण्यात आले आहे.
(३) महिला, बालके, दुर्बल घटक व अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर असते.
(४) मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने १९९३ मध्ये 'मानवी हक्क संरक्षण कायदा' संमत करून 'राष्ट्रीय
व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेले आहेत.
(२) दहशतवादामुळे कोणते परिणाम होतात, हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तर: (अ) दहशतवादाचे परिणामः
(१) मोठ्या प्रमाणात निरपराध माणसे मारली जातात.
(२) कुटुंबे उद्ध्वस्त होतात, मुले निराधार होतात.
(३) समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने विकास करू शकत नाही.
(४) मानवी हक्क पायदळी तुडवले जातात.
(५) राष्ट्रांचा विकास होत नाही.
(ब) दहशतवादाला आळा घालण्यासाठीचे उपाय:
(१) दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे.
(२) जातीयवाद, वंशवाद आणि धर्म श्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे.
(३) कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजील लाड न करता, त्याच वेळी त्यावर नियंत्रण आणावे.
(४) सर्व जनतेला समानतेने वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा.
0 Comments