१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश
(अ) पाकिस्तान
(क) नेपाळ,
(ब) बांग्लादेश
(ड) म्यानमार
उत्तर - क
(२) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश
(अ) पाकिस्तान व चीन
(ब) नेपाळ व भूटान
(क) म्यानमार व मालदीव
(ड) अफगाणिस्तान व अमेरिका
उत्तर -अ
(३) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी
(अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक
(ब) काश्मीर समस्या
(क) अण्वस्त्रविषयक संघर्ष
(ड) वरील सर्व समस्या
उत्तर अ
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण
(१) समानता, परस्परांबद्दल आदर या मूल्यांना अनुसरूनच भारत शेजारील राष्ट्रांशी संबंध ठेवतो.
(२) दक्षिण आशियायी राष्ट्रांत भारत हा आकाराने मोठा असलेला देश आहे.
(३) आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत शेजारील राष्ट्रांपेक्षा अधिक विकसित देश आहे. म्हणून
दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
(२) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
उत्तर: हे विधान चूक आहे; कारण -
(१) भारत व चीन यांच्यात सुरुवातीपासूनच मॅक्मोहन सीमारेषेवरून वाद चालू आहे.
(२) तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनशी भारताचे संबंध बिघडले आहेत.
(३) चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान दिल्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचला
आहे. या कारणांमुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण आहेत.
(३) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.
उत्तरः हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यात १९८५ नंतर संघर्ष वाढीस लागला.
(२) या संघर्षामुळे श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली.
(३) श्रीलंकेत हिंसाचार वाढला. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारताने शांतता निर्माण करण्याच्या
उद्देशाने श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीसाठी शांतिसेना पाठवली.
३. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१. पुढील तक्ता पूर्ण करा.
४. टीपा लिहा.
(१) सिमला करार
उत्तर: (१) १९७२ साली भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री झुल्फिकार
अली भुट्टो यांच्यात 'सिमला करार' झाला.
(२) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवरच सोडवावेत, त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान
नको, ही भारताची भूमिका होती.
(३) याच तत्त्वावर १९७२ साली दोन्ही देशांत 'सिमला करार' झाला.
(४) या कराराने भारत व पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाण घेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार
करण्यात आला. परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.
(२) भारत-नेपाळ मैत्री करार.
उत्तर: (१) १९५० साली भारत व नेपाळ यांच्यात मैत्री करार झाला.
(२) या करारामुळे भारत व नेपाळ यांच्यात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाले.
(३) नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश मिळू लागला.
(४) नेपाळी नागरिकाला भारतात सरकारी नोकरी करण्याचा व उद्योग करायचा परवाना मिळाला.
(५) नेपाळच्या पायाभूत सुविधा, अन्नधान्य आणि व्यापार याबाबत भारताने नेपाळला मदत करावी, असेही
या मैत्री कराराने ठरवण्यात आले.
(३) मॅकमोहन रेषा.
उत्तर: (१) ब्रिटिश काळातच भारत आणि चीन यांची मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमा रेषा निश्चित करण्यात
आली होती.
(२) चीनला ही सीमा रेषा मान्य नाही. या सीमारेषेवरून चीन आणि भारत यांच्यात वाद आहेत.
(३) चीनच्या मते, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश
आहे.
(४) हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले; परंतु या
सीमारेषेच्या वादातून चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमणही केले होते. सध्या सीमाप्रश्न सुटलेला नसला
तरी तो थोडा मागे पडला आहे.
(४) भारत-अफगाणिस्तान संबंध.
उत्तर: 'तालिबान' या दहशतवादी संघटनेच्या हिंसक कृत्यांमुळे अस्थिर असलेल्या अफगाणिस्तानशी
भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. भारत अफगाणिस्तानला पुढील बाबतीत मदत करतो
(१) हिंसाचाराला आळा घालून शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करणे.
(२) लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे.
(३) युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे.
(४) रस्तेबांधणी, विज्ञान व तंत्रज्ञान, बंदर उभारणी, आरोग्य, सिंचन प्रकल्प उभारणी इत्यादी क्षेत्रांत मदत
करणे.
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.
उत्तर: (१) भारत आणि अमेरिका यांच्यातील समान दुवा म्हणजे दोन्ही देशांत असलेली लोकशाही.
(२) नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांनी अमेरिकेशी सांस्कृतिक,
सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले.
(३) शीतयुद्धानंतर भारताचे अमेरिकेशी सुरक्षाविषयक संबंध अधिक वाढले.
(४) सुरुवातीपासूनच अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर
अधिक दृढ झाले. अशा रितीने भारत- अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध वाढत गेले.
(२) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणांसह माहिती लिहा.
उत्तर: (१) समानता, लोकशाही, परस्परांबद्दल आदर आणि शांततामय सहजीवन या मूल्यांवर भारताचे
परराष्ट्र धोरण आधारलेले आहे.
(२) अनेकदा आक्रमणे आणि घुसखोरी करूनही भारत पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संवाद
करतो.
(३) अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन होण्यास भारताने मदत केली आहे.
(४) पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त होण्यासाठी भारताने बांग्लादेशाला मदत केली.
(५) श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारताने मदतीसाठी शांतिसेना
पाठवली.
(६) नेपाळ, भूटान, मालदीव या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकारची मदत करून तेथील लोकशाही बळकट
करण्याचा प्रयत्न केला आहे.
(३) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करीत आहे ?
उत्तर: दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) पुढील कार्य करीत आहे.
(१) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करून त्याद्वारे दक्षिण आशियाचा विकास करणे.
(२) दक्षिण आशियायी राष्ट्रांतून दारिद्र्य निर्मूलन करणे, शेतीचा विकास करणे.
(३) संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापारक्षेत्र निर्माण करणे.
(४) आशियायी राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियायी विश्वविद्यालय यासारख्या संस्था सुरू करणे.
६. तुमचे मत लिहा.
(१) भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
उत्तर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी माझ्या मते पुढील उपाय योजले जावेत
(१) दोन्ही देशांतील नागरिकांना सुलभतेने येण्या-जाण्याची मुभा दयावी.
(२) दोन्ही देशांत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वाढवावेत.
(३) दहशतवादी, फुटीरवादी आणि हिंसा करणारे अशांवर ताबडतोब बंदी आणून त्यांना कडक शिक्षा
द्याव्यात.
(४) दोन्ही देशांतील हिंसक व भडकावू भाषण करणाऱ्यांवर कारवाई करावी.
(५) दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना सतत भेटून दोन्ही देशांत मैत्रीचे वातावरण निर्माण करून हिंसेने
नव्हे; तर विकासाने आपले जीवन चांगले होईल, हे जनतेला पटवून दिले पाहिजे.
(२) भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? सकारण स्पष्ट करा.
उत्तर: (१) शेजारील राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्यास त्या राष्ट्रांचा अंतर्गत विकास साधण्यात अडथळे
निर्माण होतातच.
(२) व्यापार थांबतो. राष्ट्राच्या गरजा पूर्ण होत नाहीत, या मताशी मी सहमत आहे. परंतु,
(३) भारताचे सर्वच शेजारील राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध नाहीत.
(४) चीन व पाकिस्तान सोडल्यास बाकी अन्य शेजारील राष्ट्रांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
(३) भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात, असे तुम्हांस वाटते का? सकारण स्पष्ट करा.
उत्तर: (१) अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी महासत्ता आहे. अशा देशाशी भारताचे दृढसंबंध असल्याने ते
भारताच्या आर्थिक विकासाला पोषकच ठरले आहेत.
(२) अमेरिका भारताला अनेक प्रकारची मदत व तंत्रज्ञान देते. मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री देते.
(३) अमेरिकेने भारताशी आण्विक करारही केला आहे.
(४) भारतातील अनेक तरुण नोकरी व शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. एकूण पाहता अमेरिकेशी असणारी
दृढमैत्री भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरली आहे, असे मला वाटते.
0 Comments