21.संतवाणी

 



१. आकृती पूर्ण करा.

उत्तर:


संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व


1. शब्द रत्ने व शस्त्रे आहेत.


2. शब्द हे जीवनाचे सर्वसव व शब्द हा देव आहे.


 




प्र. २. सूचनेनुसार सोडवा.


(अ) ‘धन’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: संत तुकारामांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे


 


(आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण......

उत्तर: शब्द हा त्यांचा देव आहे.


प्र. ३. खालील संकल्पना स्पष्ट करा.


(अ) शब्दांचीच रत्ने


उत्तर: 


            संतांजवळ पैसा-अडका, जड-जवाहीर अशी लौकिक संपत्ती नसते. पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमुल्य रत्न असे संबाधले आहे.


 


(आ) शब्दांचीच शस्त्रे


उत्तर: 


            संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रुवर विजय मिळवता येतो, तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षडरीपुंचा विकारांचा पराभव करता येतो म्हणून संतांकडे असणारे शब्द ही शस्त्रे आहेत.


 






प्र. ४. शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे, या अर्थाची कवितेतील ओळ शोधा.

उत्तर: शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन


प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

 


(अ) ‘शब्द वाटूं धन जनलोकां’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: 


            लौकिक अर्थाने कोणतीही धनदौलत आमच्याकडे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात. लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात. त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो असे संत तुकाराम महाराज म्हणायचे आहे.


 


(आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: 


            संत तुकाराम महाराज म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे. आणि षड् विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मन:पूर्वक उपासना करणे, हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.


(इ) ‘शब्दांचे सामर्थ्य अफाट असते’ या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा

उत्तर: 


            मी लहानपणी जेवताना माझ्या आवडीची भाजी नसली तर मी त्या दिवशी जेवायचो नाही. माझी बहीण मला मी जेवण्यासाठी माझी समजुत काढायची. असाच एक दिवस माझ्या आवडीचे जेवण नव्हते आणि मी आईला जेवण्यासाठी नकार दिला. आई मला समजवू लागली की तू जेवला नाहीस तर आजारी पडशील. पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. तेव्हा ती म्हणाली तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही, मी आजारी पडलेले चालेल तूला. ते आईचे बोलणे ऐकून मला माझाच राग आला आणि त्या दिवसापासून मी सर्व प्रकारचे जेवण खायला सुरूवात केली.


(आ)


 


१. चौकटी पूर्ण करा.


(अ) संत सावता महाराजांची मागणी

उत्तर: संतांची आठवण व संगत


 


(आ) संतांनी दाखवला तो मार्ग

उत्तर: भक्तिमार्ग


 


प्र. २. सूचनेनुसार करा.


(अ) अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा.

उत्तर:नारायण


 


(आ) ‘संत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: संत सावता माळी यांना कोणाची संगत घडावी असे वाटते


 


(इ) संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? (एका वाक्यात उत्तर लिहा.)

उत्तर:संत सावता माहराजांना संतांची संगत हवी.


प्र. ३. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.


(अ) संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: 


            संत सावता महारज म्हणतात हे देवा , आम्हांला कोणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हांला संतांची आठवण राहावी हीच आमची मनापासून इच्छा आहे. संतसज्जन हेच आम्हांला भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हाणून आम्हांला. संतांचा कायम सहवास लाभावा, म्हणून आम्हांला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत. त्यांच्या ठायी लीन राहावे हीच आमची मनोकामना आहे.


 


(आ) संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा.

उत्तर: 


            संत सावता महाराज म्हणतात संत हेच आम्हांला खरा भक्तीमार्ग दाखवतात ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते, हे आम्हांला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशी करतात.


 


(इ) ‘सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात’ हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या.

उत्तर: 


            प्रस्तूत अभंगात संत सावता माळी हे परमेश्वराला अंत:करणापासून विनवतात की हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घडवून दे. संत सावता माळी यांच्या मते, संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते लोकांना भक्तीमार्ग दाखवतात म्हणून ते  संतांच्या सहवासाची याचना करतात. संतरूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी, ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments