१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो?
उत्तर: कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो.
(आ) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती?
उत्तर: सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.
(इ) कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला?
उत्तर: मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.
प्र. २. खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
(अ) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे-
उत्तर: मातृभूमी हे कवींचे दैवत आहे. या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते. म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत.
(आ) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा-
उत्तर: कवी मातृभूमीला माउली संबोधतात व स्वत: लहान बाळ समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यामुळे मी तुझे तान्हे लेकरू आहे.
प्र. ३. हे केव्हा घडते ते लिहा.
(अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते............
उत्तर: जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात, तेव्हा कवींची ललाटरेषा प्रयाग काशी बनते.
(आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो............
उत्तर: जेव्हा कवींची वाणी मातृभूमीरूप आईच्या दुधाने भिजून जाते, तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात.
प्र. ४. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव.
उत्तर: शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
(आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्यप्राप्त झाल्याने गाणे गाईन.
उत्तर: आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
प्र. ५. कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर:
१. पांग फेडणे
वाक्य: ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले, त्यांचे पांग फेडायला हवे
२. पायधूळ घेणे
वाक्य : परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी.
प्र. ६. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.
उत्तर:
सारे – तारे
कशाला – आला
गाणी – वाणी
जराशी – काशी
तान्हा – पान्हा
प्र. ७. स्वमत.
(अ) कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.
उत्तर:
कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझया शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पासधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे.
(आ) ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
मातृभूमी ही माता आहे. ती तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माउलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्रभावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र – सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे. असे कवी म्हणतात.
(इ) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा
उत्तर:
मातृभूमीचा गौरव करताना कवी म्हणतात. हे मातृभूमी तुझी मी आरती सुर्य, चंद्र व तारे आणून करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पान्ह्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला . तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग- काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरवगीत गाणार आहे.
0 Comments