16.चोच आणि चारा




 १. खालील आकृती पूर्ण करा.


(अ) उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल

१. चोच


२. चोचीची संरचना


३. एग टूथ


 




(आ) पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी

१. पक्ष्यांचा रंग


२. उडण्याची किंवा बसण्याची पद्धत


३. चोचीचा आकार






(अ)  चोचींचे विविध उपयोग

१. अन्न्‍ शोधणे.


२. बिया फोडणे.


३. अन्न खाणे.


४. घरटं बांधणे.


५. पिल्लांना भरवणे.


६. झाडावर चढणे.

प्र. २. एका शब्दांत उत्तर लिहा.


(अ)         चोचीचा वरचा भाग-

उत्तर: मॅक्सिला




(आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग-

उत्तर: एग टुथ




(इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी-

उत्तर: हॉर्नबिल




(ई) ‘एग टूथ’ नसलेला पक्षी-

उत्तर: किवी


प्र. ३. कोण ते लिहा.


(अ) ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ करणारा पक्षी-

उत्तर: फ्लेमिंगो




(आ) चोचीचा सर्वांत वेगळा उपयोग करणारा पक्षी-

उत्तर: स्टॉर्क




(इ) ‘शक्करखोरा’ म्हणून ओळखले जाणारे पक्षी-

उत्तर: सनबर्ड्स




(ई) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी-

उत्तर: सुगरण


प्र. ५. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


(अ) ‘चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात’ या विधानाचा अर्थ.

उत्तर: 


                प्रत्येक पक्षाचे भक्ष्य हे वेगवेगळे असते. प्रत्येक पक्ष्याच्या चोचीचा आकार हा त्याला त्याचे भक्ष सहज पकडता येईल असा असतो. पक्ष्यांचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येते की जमीनीवरील किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चोच ही सरळसोट असते. उदा. सुतार पक्षी. गरूड व घार हे सापांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची चोच ही अणुचीदार असलेली पहायला मिळते. फलांमधला मधूर रस चोखणाऱ्या शिंजीर पक्ष्याची चोच ह‍ि लांब व बाकदार असते.


 


(आ) पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.

उत्तर: 


                पक्ष्यांच्या चोचपुराणातून अशी माहिती मिळते की प्रत्येक जिवाला विशिष्ट असं स्थान आहे. आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही हत्यारं दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.प्रत्येक पक्ष्याची चोच हि त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्‌नानुसार बदलताना दिसते.


 


(इ) ‘ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो’ या म्हणीचा अर्थ.

उत्तर: 


                ईश्वराने आपली निर्मिती करत असताना आपल्याला पोट दिले तर जगण्यासाठी लागणारे अन्न देखील ईश्वरच उपलब्ध करून देईल. तसेच ईश्वराने पक्ष्यांना चोच  दिली आहे तर त्याच्या चोचीत चारा म्हणजेच त्या पक्ष्यांना लागणारे अन्न देखील ईश्वरच देईल. याचा अर्थ असा नाही की आपण मेहनतच करायची नाही. आपल्याला मेहनत करावी लागेल, ईश्वर आपल्याला अन्नापर्यत पोहचवण्यासाठी मार्गर्शन करेल.


 


प्र. ६. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.


(अ) सनबर्ड्‌स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.


उत्तर: सनबर्ड्‌स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.




(आ) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.


उत्तर: बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.




(इ) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.


उत्तर: तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.




(ई) घार आपली शिकार घट्ट पकडते.


उत्तर: घार आपली शिकार घट्ट  पकडते.




 


प्र. ७. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.

उत्तर:


१.     पोपट : चोचीचा वापर पायासारखा करतो.




२.    सन बर्ड्स : फुलांमधला मधुररस चोखतात.




३.    सुगरण : कलात्मक घरटे विणते.




४.   खंड्या  व वेडा राघू : चोच सरळसोट




५.    फिंच : तेरा जाती आणि त्यांच्या चोचींचे अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगवेगळे असतात.




६.    हॉर्न बिल: सर्वात अधिक वैशिष्ट्यपूर्ण चोच




७.   फ्लेमिंगो : चोच मध्येच वाकडी




८.    गरूड, घार, ससाणा : अणकुचीदार चोच




९.सुतार, हुप्पो : सरळसोट चोच


 


खेळूया शब्दांशी.




(अ) खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटींत लिहा.






1) सुंदर गुलाब       


               




2)रंगीबेरंगी मोर


 


भाषासौंदर्य




(१) मूर्ती लहान पण किर्ती महान .


(२) शितावरून भाताची परीक्षा .


(३) सुंठीवाचून खोकला गेला .


(४) रात्र थोडी सोंगे फार .


(५) उथळ पाण्याला  खळखळाट फार .


(६) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ .


(७) झाकली मुठ सव्वालाखाची .


(८) घरोघरी मातीच्या चुली .


(९) कोल्ह्याला द्राक्ष आंबट .


(१०) अंथरूण पाहून पाय पसरावे .


(११) इकडे आड तिकडे विहिर.


(१२) काखेत कळसा गावाला वळसा .


(१३) थेंबे थेंबे तळे साचे .


(१४) खाईन तर तूपाशी नाहीतर उपाशी .


(१५) हातच्या काकणाला आरसा कशाला?

Post a Comment

0 Comments