प्र. २. हे केव्हा घडते ते लिहा.
(अ) पाखरांचा थवा येतो..........
उत्तर: जेव्हा शिवारात पीक येते.
(आ) तान्हा रडत उठतो ..........
उत्तर: जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो.
प्र. ३. कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघतक्ता तयार करा.
१)अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे.
२) शेताची नांगरणी करणे
३) बियाणे पेरणे
४)अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे.
५) जोंधळ्याची रोपे वर येणे
६) जोंधळ्याची काढणी करणे.
प्र. ४. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:
उठतो = फुटतो.
फाटतो = फुटतो
उठतो = फुटतो
ओला = आला
वाटतो = फुटतो
करतो = भरतो
तुटतो = फुटतो
(अ) ‘भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल- मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की, जणू शेतकऱ्याच्या घामाचा घामाच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात. त्या वेळी आकाशाला पान्हा फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पवसाच्या रूपात झरतो.
(आ) ‘शेतकरी जगाचा पोशिंदा आहे’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो. मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे म्हणतात.
0 Comments