प्र. २. कारणे लिहा.
(अ) लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण.....
उत्तर: शरीराच्या अस्वास्थामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती.
(आ) लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण.....
उत्तर: झेनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवननृत्य लेखकाने पहिले.
प्र. ३. योग्य जोड्या लावा.
प्र. ५. पाठाच्या आधारेतुमच्या शब्दांत लिहा.
(अ) या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
उत्तर: मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक , आनंददायक , रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे. ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये.
(आ) निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
उत्तर: फुले, फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात. कारण या घटकात जीवनाची, आनंदाची, चैतन्याची कारंजी थुई थुई उडत असतात. त्यामुळै मनावर आलेले मळभ नाहीसे होते व मन आनंदी होते.
प्र. ६. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या वचनातील विचार स्पष्ट करा.
उत्तर:
आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट आलल्याला चांगली वाटते व नकारात्मकतेने पाहिले असता तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते. उदाहणार्थ पाऊस पडत असतानाच काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल झाला म्हणून नाराज होतात. याच प्रकारे जर आपण चांगले, आपले विचार चांगले तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते. म्हणून जशी तशी सृष्टी असे म्हणतात.
प्र. ७. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी
येथे थुई थुई उडत होती.
तसल्या त्या सुंदर, बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच
सुंदर, बहुढंगी फुलपाखरे उडत होती.
नाचरे ओढे आणि हरिततृणांचे गालिचे,
माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते.
एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन सवत:शीच नाराज होऊन बसले हाते.
आंबट तोंड आणि लांबल चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत.
जीवन म्हणजे संकट नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत.
जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे.
जीवन जर कुठे फुलत असेल, डुलत असेल,
नाचत असेल, गात असेल तर ते इथे.
0 Comments