प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
अ.गोधडीची वैशिष्ट्ये
1.फक्त चिंध्यांचा बोचका नसते.
2. मायेलाही ऊब देणारी
3. बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर
4. आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर.
आ.गोधडीत चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती
1.आई
2.वडील
3.मामा
4.भाचा
प्र. २. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
(अ) आयुष्यभर कष्ट
(आ) संसारात खाल्लेल्या खस्ता
(इ) मायेची ऊब
(ई) स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी.
प्र. ३. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेलेतुमचे भावनिक नातेतुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर:
मी चौथीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. त्यावेळी मला बक्षीस म्हणून श्यामची आई हे पुस्तक मिळाले होते. माझ्या आयुष्यातील ते पहीलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे. ते पुस्त मिळाल्यावर काही दिवसांतच वाचून पूर्ण केले. आणि त्या पुस्तकाला मी माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या कपाटात जपून ठेवले आहे. माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे.
प्र. ४. आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.
उत्तर:
मायेलाही मिळणारी ऊब
गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या
लुगड्याचे पटकुर
बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे
आईची स्मृतींची सुई
प्र. ५. खालील ओळींतील भाव स्पष्ट करा.
(अ) ‘गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.’
उत्तर: गोधडी हे आई वडीलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतिक आहे. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई वडीलांनी खूप कष्ट सोसले. त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई- वडीलांचे आहे. असे कवींना सुचवायचे आहे.
(आ) ‘गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.’
उत्तर:
गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे.
लिहिते होऊया
‘गोधडीचे आत्मकथन’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.
उत्तर :
गोधडीचे आत्मकथन
मी गोधडी बोलत आहे. मला काही जण वाकळ या नावाने देखील ओळखतात. माझा जन्म एका गरीब शेतमुराच्या घरी झाला. श्रीमंत लोकांच्या घरी मी जन्म घेत नाही. माझ्या झांपडीच्या अवतीभवती अशाच शेतमजूरांची घरे आहेत. आमच्या घरी एक लहानगे बाळ होते. एकदा गंमतच झाली. ते बाळ अचानक खूप रडायला लागले. आईने त्याला कोणतेतरी खेळणे दिले तरी त्याने ते घेतले नाही. मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. तेव्हा त्याने रडणे थांबवले. आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी. तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला. रात्रभर तो माझ्याच कुशीत दडून होता. माझ्या जन्माचीही एक कहाणी आहे. आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या. त्यात तिच्या कधीकाळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालेले तिचे लुगडे होते. बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते. मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या. त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या. त्यातून माझा जन्म झाला. मला झोपडीतच राहणे आवडते. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे.
“राजास जी महाली सौख्य कधी मिळाली”
“ सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या”
0 Comments