11.स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा




 प्र. १. चौकटी पूर्ण करा.

खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट

उत्त्तर:


1.     तर्कसंगत


2.     तर्कशुद्ध


प्र. २. वैशिष्ट्ये लिहा.

1.      श्रीपादशिला


उत्तर:


१.पाण्याच्या भरपूर वर होती.


२. किनाऱ्यापासून समुद्रात एक – दीड फल्लांग आत होती.


 


2.   शार्क मासे


उत्तर:


१. माणसाला ते काकडी सारखे चावून खातात.


२. शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात.


 


३. हे केव्हा घडेल ते लिहा.


(अ) परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील.


उत्तर:  मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर


(आ) माणसाची अंत:स्थ चेतना फुलेल.


उत्तर: विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर


प्र. ४. परिणाम लिहा.


(अ)  स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले-

उत्तर:  स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांना समजले.


 


(आ) नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले-

उत्तर:  स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली, पोहत पोहत  स्वामीजी त्या शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्‌वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.


 




प्र. ५. तुमचे मत लिहा.

(अ) ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.

उत्तर: 


          एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते.  वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही, हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींना मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसांत तीन खंड वाचून परत केले. हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचनवेड आहे, असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरूपयोग करतात. या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात.


 


(आ) पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.

उत्तर: 


          शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून जावे लागणार  होते. आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयान नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. बहुतांश जणांचे असे मत असेल की नावाड्यांनी स्वामींना पैसे न घेताच पोहोचवायला हवे होते. परंतू ते नावाडी स्वामींची मोठेपण ओळखत नव्हते.  तसेच माणसांना पैसे घऊन नावेतून इच्छित स्थळी पोहचवणे हा नावाड्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी पैशाशिवाय सोडण्यास नकार दिला. तसेच स्वामींचे मोठेपण अवगत झाल्यावर त्यांना पश्चाताप देखील झाला. यामुळे नावाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही.


प्र. ६. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.

(अ) निर्भयता-


उत्तर: 


१.     स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली.


२.    मी आता दोन- तीन दिवस इथेच राहणार.


३.    रात्री एकटेच सोबतीला कोणी नाही.


(आ) मनाची एकाग्रता-


उत्तर: 


१.     ते रोज एक खंड वाचायचे.


२.    मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो.


३.    मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.


 


(इ) दृढनिश्चय: 


उत्तर: 


१.स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले.


२. ते रोज एक खंड वाचायचे.






(ई) देशप्रेम-


उत्तर: 


१.                     ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश , तो समाज, एकदा डोळ्यांखालून घालावा.


 


(उ) वाचनप्रेम-


उत्तर: 


१.     इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड  वाचत असत.


२.    ते रोज एक खंड वाचायचे.


३.    त्यांनी तीन दिवसांत एकेक खंड वाचून परत केला.


 


७. तुमचा अनुभव लिहा.


(अ) ‘काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो’, याविषयी तुमचा अनुभव.

उत्तर: 


          सामाही परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली होती. तरीही मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मी आजारी पडलो आणि ७ दिवस अभ्यास करू शकलो नाही. उरलेल्या दिवसांत मी मन लावून अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उर्त्तीण झालो. ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहीली. पुढील परीक्षांचा अभ्यास मी खूप दिवस आधी पासून सुरू करू लागलो.


 


प्र. ८. खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.


स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार


खेळूया शब्दांशी.




(अ) ‘निर्भय’पासून ‘निर्भयता’ हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’, ‘आळू’, ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.


 (आ) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.



(अ) सर्वांनी बेसावध राहून काम करू नये.


उत्तर:  सर्वांनी सावध राहूनच काम करावे.




(आ) गाडी वेगाने चालवू नये.


उत्तर:  गाडी हळू चालवावी.




(इ) शिळे अन्न खाऊ नये.


उत्तर:  ताजे अन्न खावे.




(ई) कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये.


उत्तर:  सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.




(उ) जॉन अप्रमाणिक मुलगा नाही.


उत्तर:  जॉन प्रामाणिक मुलगा आहे.


(इ) खालील चौकटींत ‘बे’ हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा.

बे


उदा.,बेसावध.


1.बेसुमार


2.बेजबाबदार


3.बेफिकीर


4.बेपर्वा


5.बेअब्रू


 


आपण समजून घेऊया



·        खालील तक्ता पूर्ण करा.



Post a Comment

0 Comments