प्रश्न २. परिसर स्वच्छ करतो, तसे आपणही स्वच्छ राहायला हवे. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता ते लिहा.
उत्तर -
१) दररोज सकाळी दात घासणे.
२) दररोज अंघोळ करणे.
३) वेळोवेळी एकदा केस कापणे.
४) वेळोवेळी नखे कापणे.
५) बाहेरून खेळून आल्यावर हात-पाय-तोंड स्वच्छ धुणे.
६) स्वच्छ कपडे घालणे. कपड्याला मळ न लागू देणे.
प्रश्न. ३. खालील प्रसंग वाचा. यामधील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत, पण स्वच्छता तर व्हायला हवी. ते काय करू शकतील, ते सुचवा
(१) सुनीता मावशीकडे राहायला आली होती. सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की, तिचा ब्रश ती घरीच विसरून आलीय. ती आता दात कसे साफ करू शकते ?
उत्तर - सुनीता बोटावर पेस्ट घेऊन दात घासू शकते.
(२) जमील अंघोळ करीत होता. दोन तांबे पाणी ओतले अन् त्याच्या लक्षात आले की, मोरीतला साबण संपलेला आहे. आता जमीलला स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल ?
उत्तर - जमील कडुनिंबाच्या पाल्याने अंग घासू शकतो.
(३) रोहित सकाळी उठला. शौचालयात जाऊन आला. हात धुवायला साबणच नव्हता. आता तो हात कसे स्वच्छ करेल?
उत्तर - रोहित फक्त साध्या पाण्यानेही चोळून हात धुवू शकतो.
(४) नखांमध्ये घाण साचून राहते. तसे होऊ नये, म्हणून सरांनी नखे कापून यायला सांगितले होते; पण अंबूच्या घरात नेलकटर नव्हते. मग तिला नखे कापण्यासाठी काय करता येईल ?
उत्तर - अंबू ब्लेडने किंवा धारदार कात्रीने नख कापू शकतो. पण त्यासाठी त्याला मोठ्या माणसाची मदत लागेल कारण ब्लेड किंवा कात्रीने जखम होण्याची शक्यता आहे.
वाचा व वर्गीकरण करा.
केळ्यांच्या साली, कागद, खरकटे, तुटका कप, तुटके पेन, कॅरी बॅग, शिळे अन्न, खराब वहीचा पुट्ठा, पालेभाज्यांची देठे, फळांच्या साली, सडलेली फळे, तुटकी खेळण
उत्तर -
सुका कचरा
(१) कागद
(२) तुटका कप
(३) तुटके पेन
(४) कॅरी बॅग
(५) खराब वहीचा पुठ्ठा
(६) तुटकी खेळणी
ओला कचरा
(१) केळ्यांच्या साली
(२) खरकटे
(३) शिळे अन्न
(४) सडलेली फळे
(५) पालेभाज्यांची देठ
(६) फळांच्या साली
0 Comments