(अ) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव
उत्तर: कोढूनगलर
(आ) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स
उत्तर: रेडीओ कोर्स
(इ) मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज
उत्तर: संपूर्ण स्वराज्य
(ई) राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार
उत्तर: ‘ॲवार्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’
प्र. २. कारणे लिहा.
(अ) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं, कारण.....
उत्तर: समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या.
(आ) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण.....
उत्तर: त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.
(इ) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण.....
उत्तर: वादळाचा जोर इतका मोठा होता . की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना.
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
राधिका मेनन यांचे गुणविशेष
१) उत्तुंग इच्छाशक्ती
२) रोमांचकारी प्रवासाची आवड
३) धाडस
४) काहीतरी करून दाखवण्याची हिंमत
प्र. ४. मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा.
उत्तर:
१) सुटकेच्या मोहिमेला सुरुवात
२) जहाजातले लोक बचावकार्यासाठी सज्ज झाले.
३) वादळाच्या शक्तीविरुद्ध कर्मचारी निकराचा प्रयत्न करीत राहिले.
४) पहिला प्रयत्न अयशस्वी
५) दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला.
प्र. ५. स्वमत लिहा.
(अ) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छिमारांपर्यंत पोहचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला. राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडीद्वारा मच्छिमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतले सातही मच्छिमार सहीसलामत वाचले होते.
(आ) धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.
उत्तर: धाडस आणि हिंमत असल्यामुळेच नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आईवडिलांना तिला परवानगी द्यावी लागली. मच्छिमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा सफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती त्यांचा प्राण वाचवू शकली. या सर्व घटनेतून धाडस आणि हिंमत असली की, कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते.
(इ) मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.
उत्तर: या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिणे अपेक्षित
खेळूया शब्दांशी.
खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
(१) युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.
उत्तर: जीवाची बाजी लावणे – स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली.
(२) मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.
उत्तर: जीवाच्या आकांताने ओरडणे – पुरामध्ये वाहून जाताना काही लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते.
आपण समजून घेऊया.
(१) खालील जोडशब्दांचा संधिविग्रह करून तक्ता पूर्ण करा.
(अ) उत्तरे लिहा.
(१) जाहिरातीचा विषय-
उत्तर: जि. प. वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश
(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार)-
उत्तर: शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव
(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
उत्तर: घटक १००% गुणवत्तेची हमी
(४) जाहिरात कोणासाठी आहे?
उत्तर: इ. पहिली ते आठवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये
उत्तर:
१) आकर्षकता
२) उपयुक्तता
३) वेगळेपण
४) उत्सुकता निर्मिती
0 Comments