७ आण्णाभाऊंची भेट


प्र. १. नातेसंबंध लिहा.

(अ) विठ्ठल उमप- भिकाजी तुपसौंदर – मित्र

(आ) जयवंता बाय- अण्णा भाऊ साठे – पती-पत्नी

(इ) अण्णा भाऊ- गॉर्की – शिष्य-गुरु

प्र. २. आकृत्या पूर्ण करा.

अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
(अ) साधी राहणी उच्च विचार

(आ) वास्तववादी जीवन जगणारे

(इ) पैशांचा मोह नसलेले निस्वार्थ

(ई) वास्तववादी लिखाण करणारे.

 
झोपडीतील वास्तव

(अ)झोपडीत पाणी साचलेले एक डबके  

(आ) चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडे

(इ) झोपडीत एकच तांब्या, अल्युमिनियमचे ताट व डेचकी  

(ई) दोरीवर एक सदरा व हंगरला एक लेंगा.

प्र. ३. एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.

(अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण
उत्तर: चिरानगर

 

(आ) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन
उत्तर: ट्रान्झिस्टर

 

(इ) अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर
उत्तर: मॉस्को

प्र. ४. उत्तरे लिहा.
 

(अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर: ऐषारामात राहता येणे शक्य असूनही अण्णा भाऊ साठे झोपडपट्टीत राहत. त्यांची झोपडी गळकी होती. झोपडीतच डबकी होती. मोडकी खुर्ची, मोडके टेबल, एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते. एक तांब्या जर्मनचे एक ताट, एकच देच्की एवढीच घरात भांडी होती. एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे. चुलीत लाकडे होती, पण तीही अर्धी जाळलेळी. कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मूळते बनियन होते. अण्णा महान लेखक होते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या गाजत होत्या. ते सतत लिहित असेलेले दिसत. लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता. असे अण्णांचे राहणीमान होते.

 

(आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: अन्न भाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते. ते आपल्या साहित्यातून दिनदलितांची हलाखी, त्यांचे दैन्य, दारिद्र्य मांडत होते. त्याचवेळी त्यांना नवीन क्रांतिकारक कालवणात विठ्ठल उमप यांच्या रुपात उदयाला येत असेलेला आढळला. विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या. त्यांचा बुलंद पहाडी आवाज, त्यांची वर्तणूक, त्यांच्या आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते. दिनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते. तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला. म्हणून अन्नाच्या दृष्टीने तो सुदिन होता.

 

(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर: उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते. त्यांच्या मनात गरीबंविषयी दिनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता. अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती. म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडीची अवश्ता पाहून त्यांना तिटकारा, किळस वाटली नाही. अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते. अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात. याची त्यांना खंत वाटत असे.

 

(ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर: विठ्ठल उमप यांनी अत्यंत सुंदर शब्दांत अण्णा भाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. अण्णा भाऊ हे महान लेखक होते. अण्णा भाऊ यांच्या साहित्यातून दिनदुबळ्यांच्या व्यथा-वेदना, सुख दुखः साहित्यातून मांडत . त्यांच्या मते हे साहित्य गरिबांची वास्तव स्थिती दाखवणारे असायला हवे. आणि वास्तव स्थिती दाखवण्यासाठी ती स्वतःला माहिती हवी. म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी ते झोपडीत राहत. लेखकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे. तरच लोकांची दुखः त्यांच्या अडचणी समजून येतील. आपल्या लेखनात कृत्रिमपणा येऊ नये, म्हणून ते झोपडीत राहत होते. यात अण्णांचे मोठेपण दिसून येते.

खेळूया शब्दांशी.



खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
 

(१) जुई रेहाना जॉर्जसहलीला निघाले

उत्तर: जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.

 

(२) अबब केवढा हा साप

उत्तर: अबब ! केवढा हा साप!

 

(३) आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा

उत्तर: आई म्हणाली, “सर्वांनी अभ्यासाला बसा.”

 

(४) आपला सामना किती वाजता आहे

उत्तर: आपला सामना किती वाजता आहे?

 

(५) उद्या किंवा परवा मी गावी जाईन

 उत्तर: उद्या किंवा परवा मी गावी जाईन.

Post a Comment

0 Comments