अ) थंडीमुळे खोबरेल तेल गोठले आहे. ते पातळ करायचे आहे.
थंडीमुळे खोबरेल तेल गोठल्यास ते पातळ करण्यासाठी त्याला उष्णता द्यावी.
आ) जरा डोके चालवा.
१) पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात?
पावसाळ्यामध्ये हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते, हे बाष्प पॅकेट बाहेरील बिस्किटाला लागल्यामुळे ती बिस्किटे सादळतात.
२) पाण्यामध्ये पोटॅशिअम परमॅगनेट स्फटिक टाकले तर पाण्याला रंग का येतो?
पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे स्फटिक टाकल्यावर ते पाण्यात विरघळतात त्यामुळे पाण्याला रंग येतो.
३) पाण्यामध्ये गुळ टाकून चमच्याने ते पाणी ढवळले तर पाणी गोड का लागते?
पाण्यामध्ये गुळ टाकून चमच्याने ते पाणी ढवल्यास गुळ त्या पाण्यामध्ये विरघळतो आणि पाणी गोड लागते.
४) हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ साठलेला असतो त्याचे कारण काय असेल?
हिमालय पर्वताच्या शिखरावर थंड हवामान असते, तेथील तापमान खूपच कमी असल्याने हवेमधील बाष्पाचे बर्फात रुपांतर होते, त्यामुळे तिथे सतत बर्फ साठलेला असतो.
प्र २) प्रयोग करून पहा व प्रयोगाची माहिती लिहा.
प्रयोगाचे नाव : पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे.
प्रयोगाची माहिती : एका पेल्यामध्ये तो पहिला अर्धा भरेल इतके पाणी घेतले त्यात चिमूटभर रांगोळी टाकली ते पाणी चमच्याने ढवळले.
मला काय आढळले?
पाण्यात रांगोळीचे कण जसेच्या तसेच राहिले.
यावरून मला काय उलगडले?
पाण्यात रांगोळी विरघळत नाही.
प्र ३) चूक की बरोबर ते सांगा.
१) पाणी पारदर्शक आहे. बरोबर
२) शुद्ध पाणी निळसर दिसते. - चूक
३) पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो. - चूक
४) पाण्यात साखर विरघळत नाही. - चूक
0 Comments