६.असा रंगारी श्रावण


प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.
 

कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे
उत्तर:

१) रंगारी

२) कलावंत

३) खेळगा

प्र. २. प्रश्न तयार करा.
 

(अ) ‘श्रावण’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: कवीने कवितेत कोणत्या मराठी महिन्याचे वर्णन केले आहे?



(अ) ‘इंद्रधनुष्याचा बांध’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: कवीने आकाशात दिसणाऱ्या साप्रांगाच्या बाणास काय म्हटले आहे?

प्र. ३. अर्थ लिहा.
 

(अ) रंगारी
उत्तर: रंगविण्याचा व्यवसाय करणारा.

 

(आ) सृष्टी
उत्तर: निसर्ग

 

(इ) झूला
उत्तर: झोका

 

(ई) खेळगा
उत्तर: खेळ करणारा

 
प्र. ४. आकृती पूर्ण करा.
उत्तर:

श्रावण महिन्याची विविध रूपे
१)खेळगा श्रावण

२) रंगारी श्रावण

३) खट्याळ श्रावण

४) कलावंत श्रावण

प्र. ५. स्वमत.

(अ) ‘जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत’, या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: या कवितेत श्रावण महिन्याच्या मोहक रूपांचे वर्णन केलेले आहे. जून महिन्यात पावसाचा वेग वाढू लगतो, आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते. उन, पावसाच्या खेळाचा हा महिना, कधी कधी आभाळ मेघांनी पूर्ण झाकोळून जाते तर कधी लखलखीत उन पडते. तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते. असा हा श्रावण महिना फुलांनीही सजतो. दरी, डोंगर, ओढे आकशा या ठिकाणी निसर्गाची विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. ती चीत्रांसारखीच वाटतात. निसर्गाचे प्रत्येक रूप छायाचित्रात बंदिस्त करावे अस वाटत असा लोभास्वना निसर्ग या महिन्यात आपल्याला पाहायला मिळतो.

 

(आ) ‘नागपंचमी’ आणि ‘गोकुळाष्टमी’ या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: श्रावण महिन्यात नाग पंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जात असल्याने त्यादिवशी शेतकऱ्याचा रक्षक म्हणून नागाची पूजा केली जाते. गोकुळाष्टमी या सणासाठी अनेक तरुण मुले उत्सुक असतात .आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे गोकुळ होऊन जाते. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात.

 

(इ) कवितेतून व्यक्त झालेला ‘रंगारी श्रावण’ तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे. हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला भुरळ घालणारा आहे. हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण त्यांचे प्रत्येक क्षणी, विविध ठिकाणी रंग वेगळे दिसतात, त्याचे रूप वेगवेगळे होते. हा साजिरा कालवणात आहे. त्याच्या कलाकृतींनी तो सृष्टीत विविध कशिदा काढत राहतो.

        श्रावण महिन्यात डोंगरदरीतून, ओढ्यातून जलप्रवाह खळखळ वाहत असतात. हिरवाईने निसर्ग नटलेला असतो, वेळी जोमाने वाढलेल्या असतात. अनेक सण उत्सव या महिन्यात येतात त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते. उन-पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यामुळे सगळ्यांची धावपळ होत असते. असा हा रंगांचा जादुगार असेलेला श्रावण मला खूप आवडतो.

खेळूया शब्दांशी.

 

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा.
(१) नदीशी- झाडांशी

(२) लाजल्या- सजल्या

(३) झाडाला- गाण्याला

(४) बांधतो- गोंदतो

Post a Comment

0 Comments