९ . विद्याप्रशंसा


प्र. १. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ) कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये  
उत्तर:

१) अद्भुत गुण असलेले धन आहे.

२) हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू





(आ) विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी
१) जगात श्रेष्ठत्व प्राप्त होते.

२) सदैव कल्याणकारी असते.

३) मनोरथ पूर्ण होतात.

४) गुरु प्रमाणे उपदेश मिळतो.

प्र. ३. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार

परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार

उत्तर: हिरे, मोती, पोवळे इ. नानाविध रत्नांचे खूप अलंकार असतात. ते घातल्याने माणसांचे सौंदर्य वाढते, पण विद्या या अलंकारामुळे वाढणारे सौंदर्य इतके मोठे असते की विद्येसारखा दुसरा एकही अलंकार नसतो.

 
प्र. ४. ‘विद्या’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:कोणत्या अलंकाराला जगातील सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणतात?

 
प्र. ५. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
 

(अ) कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व.
उत्तर: विद्या प्रशंसा या कवितेत कवीने विद्या गुरु सारखी उपदेश करते असे म्हटले आहे. विद्या ही अडचणीच्या काळामध्ये उपाय सुचवते. आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते. सर्व प्रकारचे सुख देते. सर्व दुखांचे निअवरण करते. हे कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्व आहे.

 

(आ) ‘त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी’, या ओळीचा सरळ अर्थ.
उत्तर: विद्या ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे. सदैव सुखकारक असलेल्या विद्या देवीची पूजा व आराधना मनोभावे करावी, नेहमी विद्यादेवीला हृदयापासून भजावे,असा उपदेश कवींनी या ओळीत केला आहे.

 
(अ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
(१) मोठेपण- श्रेष्ठत्व

(२) नेहमी- सदैव, सदा, नित्य

(३) अलंकार- भूषणे

(४) मनातील इच्छा- मनोरथ

(आ) खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.
(१) मित्र- मित्र, दोस्त, सवंगडी, सखा, सोबती.
(२) सोने – सुवर्ण, कनक, हेम, कांचन

Post a Comment

0 Comments