३ .लाखाच्या कोटीच्या गप्पा


प्र. १. आकृत्या पूर्ण करा.


(अ) गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती
उत्तर: 

(१) काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले.

(२) दोन प्रवसी दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरु केल्या.

(३) काही जणांनी बुकस्टोल वरून वर्तमानपत्र घेतले आणी ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले.

(४)ते दोन प्रवासीसुद्धा कंटाळले. मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या.

(आ) इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी
उत्तर: 

(१)पासपोर्ट मिळवला.

(२)व्हिसा काढला.

(३)चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले.

(४)काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यासाठी बाहेर काढले.

प्र. २. योग्य विधान शोधा.

(अ)    (१) लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती.

(२) म्हातारा व तरुण करोडपती होते.

(३) तरुण वकिली करायला परदेशात जात होता.

(४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण!

उत्तर: (४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण!

 

(आ)   (१) म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.

(२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.

(३) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.

(४) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.

उत्तर: (२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.

प्र. ३. तुमच्या शब्दांत लिहा.


(अ) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा.
उत्तर:

                                भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर सओरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एक तर प्रवासामध्ये उचले, भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरेतर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये, पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका-पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाच्या दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बागा पळवल्या वरही काका-पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशाला ही तसे आश्चर्य वाटले, यात काहीच नवल नाही.

 



(आ) पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.
उत्तर: 

                            सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाश्या होतात. त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी, ऐंशी लाख, चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बागेत मावणे शक्यच नाही. कोणताही  शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची  केवळ गंमत करावी , म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत, असे वाटू लागले पण शेवटी सत्याचा उलगडा होतो.

खेळूया शब्दांशी.

 

(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

 

(१) ‘‘राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?’’

उत्तर: प्रश्नार्थी वाक्य



(२) ‘‘तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.’’

उत्तर: विधानार्थी वाक्य

 

(३) ‘‘तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये.’’

उत्तर: आज्ञार्थी वाक्य

 

(४) ‘‘म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!’’

उत्तर:उद्गारार्थी वाक्य

 

(आ खालील तक्ता पूर्ण करा.


(इ) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
 

(१) गप्पा रंगणे.
उत्तर: घरी आलेल्या पाहुण्यांशी काकांच्या छान गप्पा रंगल्या.

 

(२) पंचाईत होणे.
उत्तर: या वर्षी उन्हाळी सुट्टीत देखील जादाच्या वर्गासाठी सर्व मुलांनी उपस्थित राहायला सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्याची पंचाईत झाली.

(ई) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
 

(१) त्यांचा खेळातील दम संपत आला.

उत्तर: त्याचा खेळातील दम संपत आला.

 

(२) कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.

उत्तर: कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला.

 

(३) क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

उत्तर: क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

 

शोध घेऊया.



खालील तक्ता पूर्ण करा.

Post a Comment

0 Comments