१५ .आपले शरीर


प्र १) काय करावे बरे?
१) मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे. वर्गात तिच्या अडचणी सोडवायच्या आहेत.

मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे. तेव्हा मी मैत्रिणीला वाचन व लेखन करताना मदत करेन.

प्र २) जरा डोके चालवा.

१) मित्राच्या पायाला प्लॅस्टर आहे त्याला कोणकोणत्या अडचणी येतील?

मित्राच्या पायाला प्लास्टर आहे. तेव्हा मित्राला दोन्ही पायांवर चालता येणार नाही. मांडी घालता येणार नाही. बसता येणार नाही. तसेच मैदानावर खेळ खेळता येणार नाही.

प्र ३) बरोबर की चूक ते सांगा.

१) हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे. 

चूक

२) पायांच्या मदतीने आपण जिना चढू शकतो.

 बरोबर 

३) मान पुढे झुकते, मागे वाकते.

बरोबर

४) धड फक्त कमरेपाशी वाकू शकते.

बरोबर

प्र ४) गाळलेल्या जागा भरा.

१) धडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात.

२) तंगडी आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा.

३) आपले काही अवयव वाकतात. म्हणून आपण हालचाल करू शकतो.

४) एका व्यक्ती सारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही.

प्र ५) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शरीराचे कोणकोणते भाग मिळून धड बनते?

छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते.

२) हाताचे व पायाचे तीन भाग कोणते ?

दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात. तर मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात.

३) डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास काय म्हणतात?


डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागात ' मान ' म्हणतात.

Post a Comment

0 Comments