२.माझ्या देशावर माझे प्रेम आहे .


प्र. १. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
(अ) प्रतिज्ञा
उत्तर: प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी अआप्न घोर निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांचीही बाजी लावण्याची तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय.

(आ) सस्यश्यामला माता
उत्तर: सस्य म्हणजे धन्य. शेते पिकांनी डवरून आली कि त्यांचा रंग गडद हिरवा बनतो गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो. म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धारीमाता म्हणजे सस्यशामला माता होय. या शब्दांतून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते.

प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.


(१) ‘भारतमाता की जय’मधील भारतमाता म्हणजे –
उत्तर: भारतातील लोक

 

२) महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये –
उत्तर:

१)सक्रियता

२) सुबुद्धता

 

(आ) देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती
उत्तर:

१)आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे.

२)आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल, असा विचार करीत कोणतेही काम करणे.

३) हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे.

४)नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे.

प्र. ४. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
 

(अ) प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:

प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृती आणताना मला आलेला अनुह्वा असा. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी निखील व त्याचा छोटा भाऊ राहतो. पर राज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये राजुबाजुच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणी दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता.

 

(आ) तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.
उत्तर:

आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वर ला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही चौघेजण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगाच्या जवळ गेलो. तेवढ्यात मला रंगीबेरंगी रान फुले मोठ्या प्रमाणावर उमलेली दिसले. ती फुले पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाला दंश केला. काही क्षणातच मझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली. ‘साप, साप’ मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होते. आई ताडकन धावली. “डॉक्टरांना आणा” असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषु लागली. ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची तेवढ्यात डॉक्टर आले . त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो, केवळ आईच्या प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते, याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला.

 
खेळूया शब्दांशी.



(अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.

उदा., पालनपोषण

(१) दंगा - मस्ती

(२) कोड – कौतुक

(३) थट्टा - मस्करी  

(४) धन – दौलत

(५) बाजार – हाट

(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.

(१) मी, आपण, रत्ना, त्यांचे

उत्तर: रत्ना ( गटात रत्ना हे एकाच नाम आहे. उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत. )

 

(२) राहणे, वाचणे, गाणे, आम्ही

उत्तर: आम्ही ( आम्ही हे एकाच सर्वनाम आहे. इतर शब्द क्रियापदे आहेत)

 

(३) तो, हा, सुंदर, आपण

उत्तर: सुंदर ( गटात सुंदर हे एकच विशेषण आहे, इतर शब्द सर्वनामे आहेत.)

 

(४) भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे

उत्तर: करणे. ( करणे हे एकच क्रियापद आहे, उरलेली तीनही शब्द ही विशेषणे आहेत.)

 

 
(इ) खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.

(ई) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
 

१) गगनभेदी घोष करणे -  
उत्तर: भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतीयांनी भारतमाता कि जय असा गगनभेदी घोष केला.

 

२) रचनात्मक काम करणे
उत्तर: रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले.

 

३) पोटापलीकडे पाहणे
उत्तर: मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे.

 

४) कचाट्यात सापडणे
उत्तर: शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा कि वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला.


Post a Comment

0 Comments