५ .सुरांची जादूगिरी


प्र. १. चौकटी पूर्ण करा.


(अ) गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये
उत्तर: 
१) मंद लयबद्ध व दमदार आवाज

२) जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज

३) पीठ होताना सौम्य सूर

४) गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट.

(आ) आसमंतात भरलेले संमेलन
उत्तर: 
१) शब्दांचे

२)सुरांचे

३) आवाजांचे

प्र. २. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.
 

(अ) खेडे जिथे विसावते ते ठिकाण-
उत्तर: निसर्गाची लडिवाळ मांडी.

 

(आ) खेड्याला दिलेली उपमा-
उत्तर: रानफुले

 

(इ) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्यप्र.
उत्तर: दळणाचे जाते.

३. का ते लिहा.


(अ) घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण ......
उत्तर: घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभतो.

 

(आ) कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण ......
उत्तर: कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण ते दुधासाठी आसुसलेले असते.

प्र. ४. खालील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


(अ) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.

उत्तर: अजून पूर्ण पाहत झालेली नव्हती

 

(आ) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.

उत्तर: प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला त यामुळे सर्व दिसतील झाडे झुडपे दिसू लागली.

 

(इ) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.

उत्तर: आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो.

प्र. ५. योग्य जोड्या लावा.




प्र. ६. ‘आवाजाची सोबत’ ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा .
उत्तर: खेडे गावामध्ये विविध प्रकारचे आवाज आपल्या सोबतीला असतात. परंतु हे आवाज शहरात कानावर पडत नाहीत. उदा. सकाळी पक्षांचा किलबिलाट, बांधलेल्या गाई, बकऱ्यांचे आवाज, जात्याचे आवाज यांसारखे आवाज शहरात कुठेही ऐकायला मिळत नाहीत. दिवस सुरु होण्यापूर्वीच सुरु होणारे आवाज हे दिवस संपला तरीही रात्रीपर्यंत आपली सोबत करतात. अशी आवाजाची सोबत हे संकल्पना आहे.

 



प्र.७. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.





प्र.८. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.


उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.

उत्तर:

१) खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.

२) पहाटेला पुरती जाग आलेली नसते.३) अंधाराला पिवळसर प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या सार्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते.

खेळूया शब्दांशी.

 

(अ) पाठाधारे विशेष्य-विशेषणांच्या जोड्या लावा

टाहो , तान , स्पर्श , कुर्रेबाज , मांडी , झांज , आवाज , आसुसलेला , किरटा , भरभरीत

उत्तर:


· खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.
 

मी पत्र लिहितो.



(अ) लिहिणारा तो कोण ------मी------कर्ता

(आ) लिहिले जाणारे ते काय -----पत्र-----कर्म

(इ) वाक्यातील क्रिया कोणती-----लिहितो------ क्रियापद

 

 (१) कर्तरी प्रयोग

वाक्याच्या शेवटी ‘येणे’ या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(१) मी शाळेतून आत्ताच आलो (येणे)

(२) ती शाळेतून आत्ताच आली (येणे)

(३) रवी शाळेतून आत्ताच आला. (येणे)

(४) विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले . (येणे)

 

कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पूर्ण करा.
(१) मुली क्रिकेट खेळतात . (खेळणे)

(२) तुम्ही क्रिकेट खेळता . (खेळणे)

(३) आम्ही क्रिकेट खेळतो . (खेळणे)

(४) जॉन क्रिकेट खेळतो . (खेळणे)

(५) समीरा क्रिकेट खेळते . (खेळणे)


Post a Comment

0 Comments