४ .नव्या युगाचे गाणे

प्र. १. हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) दिव्य क्रांती-

उत्तर: विज्ञानाचा प्रकाश येईल , तेव्हा दिव्य क्रांती घडेल.

 

(आ) शून्यामधून विश्व उभारेल-

उत्तर: भव्य जिद्द असेल तेव्हा, शुण्य्तून विश्व उभारेल.

 

(इ) दुबळेपणाचा शेवट-

उत्तर: नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा, दुबळेपणाचा शेवट होईल.

प्र. २. खालील चौकटींतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.

विज्ञानाचा प्रकाश आला.

क्रांती घडली.

हृदयातील अशांततेचा वणवा विझला.

नैराश्य नष्ट झाले.

 

उत्तर:

विज्ञानाचा प्रकाश आला.
क्रांती घडली.
हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
नैराश्य नष्ट झाले.
 

 

प्र. ३. खालील अर्थांच्या ओळी शोधा.
 

(अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.
उत्तर: शून्यातून विश्व उभारू जिद्द असे भव्य

 

(आ) माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात.
उत्तर: नसान्सातून जोश उसळतो नव आशा चित्ती

प्र. ५. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) ‘नवसूर्य पहा उगवतो’, ‘संघर्ष पहा बहरतो’ या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: ‘नवसूर्य पहा उगवतो’ : सूर्योदय झाल्याने जसा अंधार नाहीसा होत तसा विज्ञानरुपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे. नवनवीन शोध लागत आहे जसे की, संगणक, विज्ञान या मुळे जग अगदी जवळ आले आहे.

संघर्ष पहा बहरतो : पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे. विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले. शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते. या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे.

(आ) कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
उत्तर: विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यातून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील, अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे.

 

 

खेळूया शब्दांशी.



(अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.

उत्तर:

पुढती – क्रांती

विझला – दिसला

ज्वाला – माला

उगवतो – झळकतो- बहरतो

दिव्य – भव्य

गेले – आले

चित्ती – पुढती

(आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

(१) उजेड-

उत्तर: प्रकाश

 

(२) रस्ता-

उत्तर: मार्ग

 

(३) तेज-

उत्तर: प्रभा

 

(४) उत्साह

उत्तर: जोश

प्रकल्प : विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा.

Post a Comment

0 Comments