२२.आपल्या गरजा कोण पुरवतात ?


प्र १) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) आपल्या देशात शेती केली नाही तर काय परिणाम होतील ?

शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशात शेती केली नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही. तसेच उद्योगांना कच्चामाल मिळणार नाही.

२) तुमच्या परिसरातील व्यक्ती कोण कोणत्या व्यवसायात आहेत ते लिहा.

आमच्या परिसरातील काही व्यक्तींचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तर काही कारखान्यात काम करतात. तसेच काही डॉक्टर, शिक्षक आहेत. काही लोक सुतार काम, लोहार काम, कुंभार काम व व्यापार असे व्यवसाय करतात.

३) उद्योगांची तीन उदाहरणे द्या.

साखर उद्योग, कापड उद्योग आणि बेकरी उद्योग.

प्र २) साखळी पूर्ण करा.

१) कापूस - कापड उद्योग - कापड

२) फळे - फळ प्रक्रिया - जॅम / जेली

३) लोखंड - मोटार उद्योग - मोटार

Post a Comment

0 Comments