मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत.
उत्तर - मागील वर्षीच्या वह्यांमधील कोरी पाने काढून घ्यावी. त्यापासून नवीन वही तयार करून विविध कामांसाठी वापरावी.
आ) चित्र काढा.
कोळी जाळे कशासाठी विणतो? त्याची माहिती मिळवा.
उत्तर - भक्ष्य पकडून अन्न मिळवण्यासाठी कोळी जाळे विणतो.
कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. (त्या चित्राखाली ती माहिती लिहा.)
इ) जरा डोके चालवा.
१) कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत?
उत्तर - कापसापासून आपण कापड विणतो. काही पक्षी घरटी बांधण्यासाठी कापसाचा उपयोग करतात.
२) चपला कशापासून बनवतात?
उत्तर - प्राण्यांपासून मिळवलेले कातडे व वृक्षांपासून मिळालेल्या रबर चा वापर करून चपला बनवतात.
३) चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी काय करेल? दगड काय करेल?
उत्तर - चिमणी उडून जाईल, दगड निर्जीव असल्यामुळे काहीच बदल घडणार नाही.
४) पाल काय खाते?
उत्तर - पाल छोटे किडे खाते.
५) तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.
उत्तर - टेबल, खुर्ची, दरवाजा, कपाट
६) कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात?
उत्तर - मांजर, साप
ई ) गाळलेले शब्द भरा
१) कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल.
२) कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण कापड विणतो.
३) झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात.
उ ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात?
२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते?
३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते?
ऊ) चुक की बरोबर ते सांगा.
१) काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात.
उत्तर - बरोबर
२) वनस्पती निर्जीव आहेत
उत्तर - चुक
३) किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते.
उत्तर - बरोबर
0 Comments