(अ) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण.....
(i) पाण्याखाली जमीन आहे.
(ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.
(iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.
(iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
उत्तर - जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
(आ) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?
(i) भूखंडमंच
(ii) खंडान्त उतार
(iii) सागरी मैदान
(iv) सागरी डोह
उत्तर - भूखंडमंच
(इ) खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?
(i) नदया, हिमनदया, प्राणी-वनस्पती अवशेष
(ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी वनस्पती अवशेष
(iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण
(iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने
उत्तर - ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण
प्रश्न २. (अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे दया.
१) सागरी डोह
२) सागरी पर्वत
३) सागरी पठार
४) सागरी गर्ता
५) खंडान्त उतार
६) भुखंडमंच
(आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत ?
उत्तर - वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत.
(इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत ?
उत्तर -
भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत.
प्रश्न ३. भौगोलिक कारणे दया.
(अ) सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
उत्तर -
सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात. सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात.खनिजसंपत्ती, प्राणीसंपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
(आ) भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.
उत्तर -
मानवाच्या दृष्टीने भूखंडमंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंडमंचावरच आढळतात. भूखंडमंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहचतात. तेथे शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य असते.
म्हणून भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.
(इ) काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.
उत्तर -
सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किमी रुंद तर हजारो किमी लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. उदा., आईसलँड - अटलांटिक महासागर, अंदमान-निकोबार बेटे, बंगालचा उपसागर.
(ई) खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.
उत्तर -
भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडान्त उतार म्हणतात. समुद्रसपाटीपासून याची खोली सुमारे २०० मीटर ते ३६०० मीटरपर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडान्त उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडान्त उताराची अधःसीमा ही भूखंडांची सीमा मानली जाते.
(उ) मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.
उत्तर -
काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. त्यांपैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा,किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक इत्यादी पदार्थांमुळे जलावरणास हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. अत्यंत हानिकारक आहेत.
प्रश्न ४. पृष्ठ क्रमांक २७ वरील 'पहा बरे जमते का?' मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे ?
उत्तर - मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळाच्या बेट या भूरूपाशी संबंधित आहेत.
(आ) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत ?
उत्तर - मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे.
(इ) आपल्या देशातील कोणती बेटे पर्वतशिखरांचे भाग आहेत ?
उत्तर - आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.
0 Comments