(क्युम्युलो निम्बस, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता,
सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता)
(अ) हवेची..... अवलंबून असते हवेच्या तापमानावर
उत्तर - बाष्पधारण क्षमता
(आ) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून..... काढली जाते.
उत्तर - निरपेक्ष आर्द्रता
(इ) वाळवंटी प्रदेशात...... कमी असल्याने हवा कोरडी असते.
उत्तर -सापेक्ष आर्द्रता
(ई) ........प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
उत्तर - क्युम्युलो निम्बस
(उ) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे....... वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
उत्तर - सांद्रीभवन
प्रश्न ३. फरक स्पष्ट करा.
(अ) आर्द्रता व ढग
उत्तर -
आर्द्रता
१) हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा, म्हणजे हवेची 'आर्द्रता' होय.
२) हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते.
ढग
१) वातावरणातील किंवा हिमकण हवेतील धूलीकणांभोवती येऊन तयार झालेला मोठा समुच्चय, म्हणजे होय.
२) ढग दृश्य स्वरूपात असतात.
(आ) सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता
उत्तर -
सापेक्ष आर्द्रता
१) एका विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर, म्हणजे 'सापेक्ष आर्द्रता' होय.
२) सापेक्ष आर्द्रता (%) = निरपेक्ष आर्द्रता ÷ बाष्पधारण क्षमता × १००
निरपेक्ष आर्द्रता
१) एका विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील 'निरपेक्ष प्रमाण, म्हणजे आर्द्रता' होय.
२) निरपेक्ष आर्द्रता = बाष्पाचे प्रमाण ÷ हवेचे घनफळ
(इ) क्युम्युलस ढग व क्युम्युलो निम्बस ढग
उत्तर
क्युम्युलस ढग
१) भूपृष्ठापासून ५०० ते ६०० मी उंचीवर असणारे व तुलनेने कमी उभा विस्तार असणारे 6 ढग, म्हणजे 'क्युम्युलस ढग' होत.
२) क्युम्युलस ढग आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात.
क्युम्युलो निम्बस ढग
१) भूपृष्ठापासून ५०० ते ६०० मी उंचीवर असणारे व तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग, म्हणजे 'क्युम्युलोनिम्बस ढग' होत.
२) क्युम्युलोनिम्बस ढग वादळाचे निदर्शक असतात.
प्रश्न ४. प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) एखादया प्रदेशातील हवा कोरडी का असते ?
उत्तर -
हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखादया प्रदेशातील हवा कोरडी असते.
(आ) आर्द्रतेचे मापन कसे केले जाते ?
उत्तर -
निरपेक्ष आर्द्रता -
एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदा., सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो.
सापेक्ष आर्द्रता -
एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानवरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते.
सापेक्ष आर्द्रता (% )
= निरपेक्ष आर्द्रता ÷ बाष्पधारण क्षमता X १००
(इ) सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
उत्तर -
सांद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढणे व त्या वेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक आहेत.
(ई) ढग म्हणजे काय ? ढगांचे प्रकार लिहा.
उत्तर -
सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात.
(3) कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो ?
उत्तर -
निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो.
(ऊ) सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे ?
उत्तर -
एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानवरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते.
प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ढग हे आकाशात तरंगतात.
उत्तर -
सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार उर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर वर जाऊन तरंगू लागतो. त्याप्रमाणे उर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात.
(आ) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
उत्तर -
१) समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. त्यामुळे समुद्रसपाटी हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते.
(२) पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण शक्ती कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो.
(इ) हवा बाष्पसंपृक्त बनते.
उत्तर -
१) एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखेच होऊ शकते.
२) अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्पधारण करू शकत नाही. अशा प्रकारे, हवा बाष्पसंपृक्त बनते.
(ई) क्युम्युलस ढगांचे क्युम्युलो निम्बस ढगात रूपांतर होते.
उत्तर -
भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार उर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलो निम्बस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते.
प्रश्न ६. उदाहरण सोडवा.
(अ) हवेचे तापमान ३०° से असताना तिची बाष्पधारण क्षमता ३०.३७ ग्रॅम/मी असते जर निरपेक्ष आर्द्रता १८ ग्रॅम प्रतिघनमीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती असेल ?
उत्तर -
सापेक्ष आर्द्रता (%) = निरपेक्ष आर्द्रता ÷ बाष्पधारण क्षमता
= १८०० ÷ ३०.३७ × १००
= ५९.२६%.
(आ) एक घनमीटर हवेत ०° से तापमानावर ४.०८ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल ?
उत्तर -
निरपेक्ष आर्द्रता = बाष्पाचे प्रमाण ÷ हवेचे घनफळ
= ४.०८ ÷ १
= ४.०८ ग्रॅम / मी^३
0 Comments