(आ) पथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो,एका तासात पृथ्वीवरील ……………
➤उत्तर➤
१५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(आ) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक
वेळेतील फरक समजण्यासाठी……………
➤उत्तर➤
दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.
(इ) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत
➤उत्तर➤
०४ मिनिटांचा फरक असतो.
प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.
➤उत्तर➤
➤१) पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ होय.
२) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या
नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते.
➤(३) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब-लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वात लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तिथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते.
➤४) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. म्हणून स्थानिक वेळ ही मध्यान्हावरून निश्चित केली जाते.
(आ) भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निक्षित केली आहे.
➤उत्तर➤
उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबादजवळील मिझापूर शहरावरून जाणारे ८२°३०’ पूर्व रेखावत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. म्हणून भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.
(ई) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.
➤उत्तर➤
सर्वसाधारणपणे तास दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांसाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात. कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे होत नाही. म्हणून कॅनडाया देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.
प्रश्न ३ रा : थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा
९०x४ = ३६० मिनिटे
३६०/ ६०= ६ तास सकाळचे
१२-६=६
सकाळचे ०६:०० वाजले असतील
(आ) एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते?
➤उत्तर➤
एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळ विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.
(इ) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.
➤उत्तर➤
जगाच्या नकाशावर पाहिले असता सावो पावलो हे ४५ पश्चिम रेखावृत्तावर आहे. भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरून ठरते. म्हणून दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक काढू.
१२८*४ = ५१२ मिनिटे
५१२/६०-८.५ तास
दोन्ही ठिकाणांध्ये साडेआठ तासाचा फरक आहे. सावो पावलो हे पश्चिम रेखावृत्तावर असल्यामुळे भारतातील वेळेपेक्षा साडेआठ तास मागे जावे लागेल. म्हणजेच भारतात सकाळचे ६.०० वाजले असतील तर सावो पावलो येथे रात्रीचे ९.३० म्हणजेच साडेनऊ वाजले असतील,
प्रश्न ४ था : मूळ रेखावृत्त २१ जुने रोजी रात्रीचे १० वाजले तेंव्हा अ,ब,क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.
0 Comments